You are currently viewing कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयातील कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सीजन प्लांट मंजूर : जिल्हा शल्यचिकित्सक

कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयातील कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सीजन प्लांट मंजूर : जिल्हा शल्यचिकित्सक

कुडाळ

कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय या ठिकाणी सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सीजन प्लांट मंजूर झाला आहे याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय याठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले या केअर सेंटर मध्ये सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत पण या ठिकाणी एखादा रुग्ण गंभीर झाला तर त्याच्यावर उपचार करता यावेत म्हणून अनेकांनी या रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन प्लांट उभारावा अशी मागणी केली होती.

त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्यावतीने सुद्धा ही मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली होती या मागणीकडे प्रशासनाने सकारात्मकरित्या विचार करून या रुग्णालयासाठी ऑक्सीजन प्लांट मंजूर केला आहे याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, हा ऑक्सीजन प्लांट जिल्हा रुग्णालयात असलेल्या ऑक्सीजन प्लांट पेक्षा मोठा आहे प्रति मिनिटाला १ हजार लिटर ऑक्सिजन या प्लांट मधून तयार होणार आहे हा प्लांट लवकरच उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा