You are currently viewing आनंदीबाई रावराणे महाविद्यालय आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा

आनंदीबाई रावराणे महाविद्यालय आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा

वैभववाडी

वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे गुरुवार दिनांक ८ डिसेंबर,२०२२ रोजी कै.आनंदीबाई रावराणे यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय आनंदीबाई मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही महिला व पुरुष अशा दोन गटांमध्ये घेतली जाणार आहे.

दोन्ही गटासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक अनुक्रमे रुपये ५००१ रुपये, ३००१ रुपये, २००१ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. या स्पर्धेचे एकूण अंतर 5 किलोमीटर असेल सर्व सहभागी स्पर्धकांना कीट व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल या स्पर्धेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंकवरून नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची अंतिम तारीख २ डिसेंबर २०२२ असल्याने त्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी लिंक – https://forms.gle/vm513xbJ9wTGxKfh7 अधिक माहितीसाठी सहाय्यक प्रा.सचिन पाटील (९५०३८०९१९२)यांच्याशी संपर्क साधावा असे महाविद्यालयाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =