You are currently viewing कळसुलकर ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त माजी सैनिक मा.सचिन सावंत यांचे मार्गदर्शन

कळसुलकर ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त माजी सैनिक मा.सचिन सावंत यांचे मार्गदर्शन

सावंतवाडी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे जनतेच्या तसेच विद्यार्थ्यांच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्यसंग्रामातील अज्ञात नायक ,क्रांतिकारक, स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी .या उद्देशाने आज कळसुलकर कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख मा.श्री उत्तम पाटील सर यांनी केले.
यावेळी कार्यक्रमासाठी माजी सैनिक माननीय सचिन सावंत यांनी सैन्य दलात नाईकपदावर कार्यरत असताना चित्त थरारक प्रसंग, अनुभव धाडस, चिकाटी, धैर्य ,शिस्त ,एकता ,संयम आणि अनुशासन याविषयी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना स्व अनुभवातून प्रत्यक्ष धडे दिले .तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला सुसंगत उत्तरे देऊन सुसंवाद साधला.याचबरोबर अग्नीवीर या नवीन केंद्र सरकारच्या योजनेत सामील होण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन देखील केले.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री मानकर सर यांनी देखील कॉलेज विद्यार्थ्यांना मोलाचेमार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सांगता विद्यार्थिनींनी भारत मातेच्या गुणगौरव गीतातून केली यासाठी परब मॅडम यांचे देखील मार्गदर्शन लाभले .
या कार्यक्रमासाठी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई तसेच सदस्य टिपणीस मॅडम यांनी देखील खूप खूप शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.श्री.प्रसाद कोलगावकर सर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + sixteen =