काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली

काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली

काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. राजीव सातव यांना करोनाची लागण झालेला असून पुण्यातील जहांगीर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यावेळी त्यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करत राजीव सातव यांच्या प्रकृतीसंबंधी विचारपूस केली आहे.

२२ एप्रिलला राजीव सातव यांनी ट्विट करत आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. “सौम्य लक्षणं जाणवल्यानंतर चाचणी केली असता आपला करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियमांचं पालन करावं,” असं आवाहन त्यांनी ट्विटमधून केलं होतं.

यानंतर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले होते. दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली असून मुंबईमधील लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमला बोलावण्यात आलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोन करुन जहांगीरमधील डॉक्टरांकडे राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. राहुल गांधी आणि डॉक्टरांमध्ये बराच वेळ चर्चा सुरु होती असं कळत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा