You are currently viewing “सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोबाईल आरटीपीसीआर लॅब मंजुर करुन देणार”

“सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोबाईल आरटीपीसीआर लॅब मंजुर करुन देणार”

-पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांचे शिवसेना नेते संदेश पारकर यांना दिली ग्वाही

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने सद्यस्थितीत असणाऱ्या आरटीपीसीआर लॅब स्टाफवर प्रचंड ताण पडत आहे. यामुळे स्वाब टेस्ट रिपोर्ट येण्याला विलंब होत असुन रुग्णांवर लवकर उपचार होताना अडचणी येत आहेत. हि अतिशय गंभीर बाब असल्याने रुग्णाच्या जिवीतास धोका निर्माण होत आहे.
या सर्व बाबींचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोबाईल आरटीपीसीआर लॅब मिळावी अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्याकडे ओरोस येथील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन केली. यासाठी लागणारे डॉक्टर, तंत्रज्ञ व इतर स्टाफ देखील उपलब्ध करुन द्यावेत अशी देखील मागणी श्री.पारकर यांनी यावेळी केली.
सदरची मोबाईल लॅब जिल्ह्यासाठी मिळाल्यास दिवसाला 2000 स्वाब घेता येणार असुन 24 तासात रिपोर्ट मिळणार आहेत. यामुळे कोरोना रुग्णांवर वेळीच उपचार करायला मिळणार असुन अनेकांचे जिव देखील वाचणार आहेत असे संदेश पारकर यांनी यावेळी सांगितले.
या मागणीचा प्राधान्याने विचार करुन सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुसज्ज अशी आरटीपीसीआर मोबाईल लॅब नविन स्टाफसह मंजुर करुन देणार अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना नेते संदेश पारकर यांना दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा