माडखोल धरणात बुडणाऱ्या दोन युवकांचे वाचले प्राण

माडखोल धरणात बुडणाऱ्या दोन युवकांचे वाचले प्राण

मित्राला वाचविण्यास गेलेला मित्रही वाहू लागला; पोलिस व ग्रामस्थानी काढले बाहेर

सावंतवाडी
माडखोल धरणाच्या प्रवाहातून वाहून खोल पाण्यात जात बुडणाऱ्या दोन्ही युवकांना स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने वाचवण्यात यश आले आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस उपस्थित होते. तर नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, माडखोल धरणात मज्जा करण्यासाठी एक युवक पाण्यात उतरला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो युवक वाहून जात होता. यावेळी त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या युवक गेला असता, तो देखील वाहून जाऊ लागला. परंतु, सुदैवाने ते दोन्ही युवक खोल पाण्यात जाऊन अडकले.

याबाबतची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी त्या ठिकाणी तातडीने धाव घेत. त्या युवकांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अखेर त्या दोन्ही युवकांना त्या खोल पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. यावेळी सावंतवाडी पोलिस निरीक्षक सचिन हिंदळेकर, वाहतूक पोलीस सुनील नाईक, सखाराम भोई, पोलिस कांडरकर आदी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा