You are currently viewing मुस्लिम समाज अल्पसंख्यांक सेलने आमदार वैभव नाईक यांचा केला निषेध

मुस्लिम समाज अल्पसंख्यांक सेलने आमदार वैभव नाईक यांचा केला निषेध

*मुस्लिम समाज अल्पसंख्यांक सेलने आमदार वैभव नाईक यांचा केला निषेध

*मुस्लिम समाज बांधवांना देशद्रोही ठरवण्याचा आमदार वैभव नाईक यांचा प्रयत्न;इब्राहिम शेख यांचा आरोप

कणकवली

उबाठा सेनेचे आमदार राजकारणासाठी मुस्लिम समाज बांधवांना बदनाम करत आहेत. राष्ट्रप्रेमी असलेल्या मुस्लिम समाज बांधवांवर चुकीचे आरोप करून देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न आमदार वैभव नाईक यांचा चाललेला आहे. राजकारणासाठी असे कृत्य करणाऱ्या आमदार नाईक यांचा मुस्लिम समाज म्हणून आम्ही तीव्र निषेध करतो असे प्रसिद्धी पत्र अल्पसंख्यांक मुस्लिम सेल चे कणकवली तालुकाध्यक्ष इब्राहिम शेख यांनी दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाज वैभव नाईक यांच्या अशा वृत्तीला कदापि थारा देणार नाही असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.
आमदार वैभव नाईक हे कोत्या वृत्तीचे आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांना आणि भारतीय जनता पक्षाला बदनाम करायचे आणि त्यासाठी कुरापती काढून मुस्लिम समाजाला टारगेट करायचे. प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करणाऱ्या मुस्लिम बांधवांवर गुन्हे दाखल करण्यास पोलीस प्रशासनावर दबाव आणायचा त्या मुस्लिम कार्यकर्त्याची बदनामी करायची ही पद्धत समाजहिताची नाही. अशा व्यक्तीला आमदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुस्लिम समाज आमदार वैभव नाईक यांच्या या वृत्तीची जशास तशी परतफेड करेल आहे. कोणत्या व्यक्तीने कोणत्या राजकीय पक्षात काम करावे हे ठविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.मात्र भारतीय जनता पार्टीत एखादा मुस्लिम समाजाचा व्यक्ती काम करतो म्हणून त्याला टार्गेट करावे ही पद्धत चुकीची आहे. एखादा कार्यकर्ता उभा का सेनेत काम करण्यासाठी येत नसेल तर त्याला प्रलोभने द्या आणि ती प्रलोभन तो स्वीकारत नसेल तर त्याची बदनामी करा. त्याला टार्गेट करा. त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करा.अशा पद्धतीची कार्यप्रणाली उबाठा सेनेची आहे.ही पद्धत मोडीत काढले जाईल असा इशाराही यावेळी इब्राहिम शेख यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा