You are currently viewing मांगेली आयी सरपंचाचा केला सरपंच पदावरून पायउतार…

मांगेली आयी सरपंचाचा केला सरपंच पदावरून पायउतार…

दोडामार्ग
मांगेली व आयी येथील थेट सरपंचाच्या अविश्वास ठरावावर सोमवार २३ रोजी ग्रामसभा होऊन मांगेलीत सूर्यनारायण तर आयी येथे प्रार्थना मुरगुडी यांना पराभवाचा सामना करावा लागला. आयी येथे झालेल्या निवडणुकीत एकूण ३९४ जणांनी मतदान केले त्यात ठरावाच्या बाजूने २८९ तर विरुद्ध ७८ मते पडली तर २७ मते बाद होऊन आयीत प्रार्थना मुरगुडी पायउतार झाल्या. तर मांगेलीत ठरावाच्या दिशेने एकूण ३९५ मतांपैकी २०५ मेते पडली तर विरोधात १५७ मते पडली. तर ३४ मते बाद झाली. या गावात शिवसेनेचे वर्चस्व असून त्याचाच वरचष्मा याही निवडणुकीत पाहावयास मिळाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × one =