You are currently viewing आनंदीबाई रावराणे असामान्य महिला- सज्जनकाका रावराणे

आनंदीबाई रावराणे असामान्य महिला- सज्जनकाका रावराणे

आनंदीबाई रावराणे असामान्य महिला- सज्जनकाका रावराणे

वैभववाडी

आनंदीबाई रावराणे या एक असामान्य महिला होत्या. पन्नास-साठ वर्षांपूर्वी मुंबईत त्यांनी आपल्या कुटुंबासाठी कापड गिरणीमध्ये काम केले. महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे माजी उच्च शिक्षणमंत्री मा.विनोद तावडे यांच्या त्या आजी होत. श्री. विनोद तावडे यांच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री. सज्जन काका रावराणे यांनी सांगितले. वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आनंदीबाई रावराणे यांच्या २९ व्या स्मृतिदिनानिमित्त इतिहास विभागाने महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांची माहिती भितीपत्रकाचे प्रदर्शन आयोजित केले होते. या भित्तीपत्रकाच्या उद्घाटन प्रसंगी त्यानी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे सचिव श्री.शैलेंद्र रावराणे, सहसचिव श्री.विजय रावराणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी. एस. काकडे, उपप्राचार्य डॉ.एम.आय.कुंभार, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन. पाटील यांनी केले तर आभार स्पंदन विभागाच्या प्रमुख प्रा.पी.एम. मांजरेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा