You are currently viewing सिंधुदुर्गात २५ जून रोजी करण्यात येणार बेमुदत आत्मक्लेश उपोषण – राजन रेडकर

सिंधुदुर्गात २५ जून रोजी करण्यात येणार बेमुदत आत्मक्लेश उपोषण – राजन रेडकर

सिंधुदुर्गातील वैद्यकीय व्यवस्थेतील मागणीची दखल राज्य आरोग्य विभाग व प्रशासनाने न घेतल्यास आमरण उपोषण – भूषण मांजरेकर

सतर्क पोलीस टाईम्स, भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, सिंधुदुर्ग विभाग, मानवाधिकार न्याय हक्क ट्रस्ट, सिंधुदुर्ग तसेच आरोग्य हक्क कृती समिती, सिंधुदुर्ग यांच्या समर्थनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना महामारीच्या काळातील ढासळलेली आरोग्य व्यवस्था शासनाने तात्काळ सुधारावी याकरिता “बेमुदत आत्मक्लेश उपोषण” दिनांक २५ जून २०२१ रोजी सकाळी ९.३० वा. पासून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, ता-कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्गात मा.जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे करण्यात येणाऱ्या बेमुदत आत्मक्लेश उपोषणातील प्रमुख मागणीत, जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जनसामान्यांना आरोग्य सेवा पुरविण्याकरिता सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारणीस तातडीने मंजुरी देवून कार्यान्वित करावे तसेच जिल्ह्यात रिक्त असलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक यांची तात्काळ नियुक्ती करावी, जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी यांच्या रिक्त पदावर तात्काळ नियुक्ती करावी या जिव्हाळ्याच्या मागण्यांकरीता बेमुदत आत्मक्लेश उपोषण करण्यात येणार आहे.
सतर्क पोलिस टाईम्स साप्ताहिकाच्या व संस्थेच्यावतीने बेमुदत आत्मक्लेश उपोषण नियोजित केल्या प्रमाणे, त्या उपोषणात एकूण १५ सदस्य बसणार असल्याची माहिती मा. मुख्यमंत्री, मा. आरोग्य मंत्री, मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व इतर संबंधितांना देण्यात आली होती. परंतु मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या दिनांक १८/६/२०२१ रोजीच्या कोविड १९ संसर्ग साखळी मोडण्यासाठी (ब्रेक दि चैन ) प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करून १५ सदस्यांच्या ऐवजी ०५ सदस्यांच्या वतीने बेमुदत आत्मक्लेश उपोषण हे कोरोना महामारीचे नियम व अटींचे तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सनदशीर मार्गाने करण्यात येणार असल्याची माहिती राजन रेडकर यांनी दिली.
सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्था ही सर्वसामान्य नागरिकांना पुरविणे हे राज्यशासनाचे व जिल्हा प्रशासनाचे कर्तव्य आहे. परंतु ती वैद्यकीय सुविधा व्यवस्थित पुरविली जात नसल्याने नागरिक त्यापासून उपेक्षित राहिलेले आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात सध्याच्या शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेची परवड झाल्याची जिल्हावासीयांना प्रचिती आलेली आहे. तसेच जिल्ह्यात प्रभारी शल्य चिकित्सकावर आरोग्य सेवेचा गाडा हाकला जात असल्याने त्याचा परिणाम जिल्हावासीयांना भोगावा लागत आहे असे सतर्क पोलीस टाईम्सचे कोकण प्रतिनिधी प्रसाद गावडे यांनी व्यक्त केले आहे.
जिल्हावासीयांना उपलब्ध असलेली आरोग्य सेवा रुग्णांना योग्य पध्दतीने मिळत नसल्याने तसेच ती अपुरी असल्याने त्यांना शेवटच्या क्षणी जिल्ह्यातील डॉक्टरांकडून रुग्णांना इतरत्र रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रुग्णाच्या पुढील उपचारांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना कोल्हापूर, मुंबई किंवा गोवा राज्यातील रुग्णालयात घेऊन जावे लागते हे जिल्हावासीयांचे दुर्दैव आहे. सिंधुदुर्गातील जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या वैद्यकीय मागण्यांची दखल राज्यशासनाने न घेतल्यास बेमुदत आमरण उपोषण सुरू ठेवण्यात येईल असे भूषण मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =