You are currently viewing कुडाळ – नेरूरपार येथे दुचाकीला झालेल्या अपघातातील जखमी भरत जाधव यांचे निधन

कुडाळ – नेरूरपार येथे दुचाकीला झालेल्या अपघातातील जखमी भरत जाधव यांचे निधन

मालवण

कुडाळ – नेरूरपार येथे दुचाकीला झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेल्या वायरी भूतनाथ जाधववाडी येथील भरत नारायण जाधव (४८) याचे शनिवारी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले…

१३ एप्रिलला हा अपघात नेरुर नागदा मारुती परिसरातील रस्त्यावर घडला होता. भरत याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. त्याच्यावर वायरी भूतनाथ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा