You are currently viewing सीमा (सरहद्द)

सीमा (सरहद्द)

*काव्य निनाद साहित्य मंच पुणेच्या सदस्या लेखिका कवयित्री सौ कविता वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*सीमा (सरहद्द)*

सीमा असतात धर्मांच्या
सीमा निती नियमांच्या
विचारांच्या चौकटीत
बंद अशा माणसांच्या

माणूस बंदीवान झाला
अधोगतीच्या सीमेत
विकास साधत नाही
अंधश्रद्धेच्या कवेत

प्रत्येकासाठी सीमा
चकोरीचा तुरुंग असतो
माणूस बंदीवानासारखा
असा जगत असतो

सीमोल्लोंघनासाठी प्रत्येक
माणूस तडफडत असतो
खोटी,प्रतिष्टा,हासू आणून
माणूस विटलेला असतो

सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =