फोंडाघाटमध्ये दीड तास तुफानी पाऊस; नदीपात्रातील बंधाऱ्यांना मिळणार दिलासा!
उकाड्यापासून मुक्ती, रस्त्यावरील धूळ झाली कमी; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला बळ
फोंडाघाट :
फोंडाघाट परिसरात आज दीड तास तुफानी पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असून, रस्त्यावरील धूळही कमी झाली आहे.
सुरुवातीला रिमझिम स्वरूपात सुरू झालेल्या पावसाने नंतर जोर धरला. या पावसामुळे परिसरातील नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. दोन्ही नद्यांवर घालण्यात आलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणी साठण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
