राजमाता जिजाऊंच्या जयंती निमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने जिजाऊ पुरस्कार प्रदान

राजमाता जिजाऊंच्या जयंती निमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने जिजाऊ पुरस्कार प्रदान

वेंगुर्ले परबवाडा येथील श्रीमती शोभा दिनकर परब यांना जिजाऊ पुरस्कार

वेंगुर्ले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी स्वराज्याचा रक्षक जन्माला घालुन त्याच्या अंगी स्वराज्य रक्षणाचे बाळकडु पाजुन त्यांना सक्षम बनवीले. त्या राजमाता जिजाऊंच्या जयंती निमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने कोकण विकास आघाडी च्या पदाधिकारी व गोरेगाव – मुंबई येथील भाजपा महिला नेत्या सुमन सावळ यांच्या हस्ते वेंगुर्ले परबवाडा येथील श्रीमती शोभा दिनकर परब यांना जिजाऊ पुरस्कार देवून गौरवण्यात आले.
परबवाडा येथील ग्रामीण भागातील अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत पतीचे निधन झाल्यावर मुलांचे पालन – पोषण केले. स्वतः रोजंदारी वर प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथील नर्सरीमध्ये काम करुन आपल्या मुलांना शिकवले. आज तीचा मुलगा ॲड. मिलिंद परब हा मुंबई हायकोर्टात प्रतिथयश वकील बनुन स्वतःच्या असोसीयेट कंपनीची स्थापना केली. अशा पध्दतीने समाजामध्ये वेगळा आदर्शच निर्माण केलेल्या श्रीमती शोभा दिनकर परब यांना जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना सुमन सावळ म्हणाल्या की भारतीय इतिहासात अनेक पराक्रमी स्त्रीया होऊन गेल्या. पण एकाच स्त्रीने भुत – वर्तमान – भविष्य यात अनोखे राजकारण करुन भगवी पताका अख्ख्या भारतभर मिरवली, आणि जिथे फडकले तिथे फक्त मुजरेच झडले . अन अभेद्य सह्याद्रीत दोन शिव – शंभु छत्रपती देणा-या राजमान्य राजश्री जिजाऊस मानाचा मुजरा !!!
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा चिटणीस निलेश सामंत, जिल्हा चिटणीस ॲड. सुषमा प्रभु खानोलकर, जिल्हा चिटणीस नगरसेविका पुनम जाधव, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले, ता सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेविका साक्षी पेडणेकर, नगरसेविका शितल आंगचेकर, नगरसेविका श्रेया मयेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, ता चिटणीस समीर चिंदरकर, सांस्कृतिक आघाडी चे शैलेश जामदार, किसान मोर्चा चे बाळु प्रभु, युवा मोर्चा चे संदीप पाटील व तुषार साळगांवकर, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय ठाकुर, अनु जाती मोर्चा चे गुरुप्रसाद चव्हाण, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस शरद मेस्त्री, ओबीसी सेलचे रमेश नार्वेकर, महिला मोर्चा च्या व्रुंदा गवंडळकर,  संध्या राणे,  गंधाली करमरकर, गार्गी राऊळ,  पुजा सावंत,  सम्रुद्धी धानजी, बुथप्रमुख – वसंत परब,  शेखर काणेकर,  नितीश कुडतरकर,  दादा तांडेल,  नारायण गावडे तसेच राजेश जामदार उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा