You are currently viewing “कलाश्री प्रतिष्ठान” धायरी, पुणे तर्फे आई स्मृतिदिनानिमित्त कविसंमेलन संपन्न

“कलाश्री प्रतिष्ठान” धायरी, पुणे तर्फे आई स्मृतिदिनानिमित्त कविसंमेलन संपन्न

धायरी, पुणे-(प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर)

धायरीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कलावती भोसले यांच्या २९,व्या स्मृतीदिनानिमित्त धायरी येथील साहित्य कल्पवृक्ष संस्थेच्या वतीने कलाश्री संकुलात काव्यसंमेलन आयोजित केले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा.सुर्यकांत नामगुडे, आणि प्रमुख पाहुणे प्रा.अशोक शिंदे होते.प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुध्द वंदना घेण्यात आली. “आई” या विषयावर कवी किशोर टिळेकर, अशोक वाघमारे,अॅड.रामचंद्र पाचुणकर,सुरेश धोत्रे, चंद्रकांत जोगदंड, कवयत्री योगिता कोठेकर, नानाभाऊ माळी,उद्यभान पाटील, गझलकार अरूण कटरे; इ.कविंनीं आईचे अर्थपूर्ण महत्त्व आपल्या कवितेतून अधोरेखित केले.

काही निवडक भक्तीगिते गाऊन संगीतकार, गायक, पं.रविंद्र यादव यांनी श्रोत्यांची मने जिंकली.कवी विनोद अष्टूळ यांनी ओघवत्या शैलीत सुत्रसंचलन करून कार्यक्रमाची रंगत आणली.कलाश्रीचे प्रमुख साहित्यिक राहुल भोसले यांनी समारोपाच्या भाषणातून कविंचें कौतुक करताना सर्वांचें आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + seventeen =