You are currently viewing जीवात्मा
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

जीवात्मा

*स्नेहल प्रकाशन परिवार सदस्य लेखक कवी प्रो.डॉ.जी.आर.उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम लेख*

*शरीर व शारीरी* *भाग 2*

*जीवात्मा !*

पंचभौतिक शरीरात प्रवेश करून , आपल्या आत्म कल्याणाचा मार्ग शोधण्यासाठीच तो पृथ्वीतलावर अवतरतो ! किंबहुना त्याचा जन्म हा त्याच्या गत जन्माचे ऋण फेडण्यासाठी !
त्याने कुठे ? केव्हा ? कुणाच्या पोटी ? कुठल्या गावात ? कुठल्या देशात ? त्याचे शेजारी कोण? आप्त गणगोत कोण ? हे सगळं अनभिज्ञ तर असतेच ! शिवाय पूर्व सुकृतानुसार त्याचा योग्य ठिकाणी पाठवणी केली गेली असते !
मी कोण ? ह्याची त्याला उपरती झालेली नसते च ! त्याचा अवतार कश्यासाठी ? हे सगळं येणारा काळ ठरवत असतो !
तरीपण त्याच्या ठिकाणी असलेला, तमोगुण युक्त अंधार दाटलेला असतोच !
षढरिपूयुक्त हे शरीर व त्याच्याठिकाणी असलेला आत्मा हा आत्मक्लेश किंवा आत्मसुख भोगण्यासाठी त्याची योजना केलेली असते .
याचाच अर्थ
पुनरपि जननं पुनरपि मरनं

पुनरपि जननी जठरे शयनं ।।

भगवान श्रीकृष्णाने सांगितल्या प्रमाणे हा जीव 84 कोटी योनी फिरतच असतो . तो त्याच्या प्रारब्धा प्रमाणे पक्षी पशु कीटक अश्या अनेकविध योनीत जन्म घेतो . मनुष्य जन्म मिळणे हे भाग्यच ! कारण मनुष्याला व्यक्त होता येत , तो मुका नाही . ह्याचाच फायदा घेऊन त्याने योग्य व्यवहार करणं त्याच्या जमेची बाजू असते . किंबहुना तो संचित पुण्यकर्माने प्राप्त करून घेऊ शकतो . पण तसे होताना दिसत नाही !
व्यक्ती तितक्याच प्रकृती ! स्वभाव गुणदोष हे तामस स्वरूपात अंधकार निर्माण करतात ! योग्य ज्ञानाची ज्योत जर मिळाली तर तो , सत्वगुणी प्रकाशाकडे जाऊ शकतो .
पण त्याला आत्मज्ञान मिळण्यासाठी योग्य गुरू वा संत , सत्पुरुष मिळणे किंवा संस्कार चांगले मिळणे , ह्यावरच तो अवलंबून आहे .
विकारी मनात व विकारी बुद्धीत षढरिपुचे प्राबल्य असतेच . आत्म उन्नतीसाठी मन बुद्धी ही कठोर झाली पाहिजेच ! जस जसे त्याला मी कोण ? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळेल तसतसे तो शारीरी हा शरीराला क्लेश देईल . बुद्धी प्रज्ञा वाढेल , मनो निग्रही होईल .
थोडक्यात काय तर आत्म्याला व शरीराला त्रास कारण मन व बुद्धी इथे बांधली जाते , जे विचार येतात ते सारासार बुद्धीतून !
मनाविरुद्ध असतीलही पण त्याचा मार्ग हा त्याचा उपरतीकडे गेलेला असतो
शरीर , आत्मा , मन व बुद्धी
ज्ञानेइंद्रिय व कर्मेंद्रिये यांची योग्य सांगड म्हणजेच आत्म ज्ञान ! हे वेगळं सांगावं लागत नाही .

प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी

अंकली बेळगाव
कॉपी राईट 31 ऑक्टोबर 2022

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 7 =