You are currently viewing सृजनशील संगीतउपचार साधक

सृजनशील संगीतउपचार साधक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी लेखक कवी विलास कुलकर्णी (आप्पा) लिखित अप्रतिम लेख*

*सृजनशील संगीतउपचार साधक*

सेवानिवृत्ती म्हणजे आपण ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीतून निवृत्त होणे. एम कॉम झालेले किशोर गोलतकर यांनी बत्तीस वर्षे बेस्ट उपक्रमात सेवा करून समाज सेवेसाठी आधीच स्वेच्छा निवृत्ती पत्करली . समाज सेवा करायची तर वेगळे काही तरी करावे म्हणून त्यांनी निसर्ग उपचार, अक्यूप्रेशर, अक्यूपंक्चर, रेकी, वास्तूशास्त्र, हस्तमुद्रा, योग व आयुर्वेद, टॉरो कार्ड रीडिंग असे विविधअंगी शिक्षण घेतले पण ते खरे रमले संगीत उपचारा मध्येच.
नुकतेच त्यांचे जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच ( साकव्य ) संस्थेसाठी ऑनलाईन व्याख्यान झाले. आज कालच्या धकाधकीच्या जीवनात संगीत हाच खरा विरंगुळा निर्माण करतो. किशोर यांनी व्याख्यानात नमूद केले की संगीत आपल्या उजव्या मेंदूला सक्रिय करते. त्यामुळे सृजनशीलता वाढते. व्यक्तीचे विचार सकारात्मक होऊ लागतात. कवी लेखक गायक संगीतकार थोडक्यात म्हणजे कलाकारांची प्रतिभा शक्ती वाढते. कोणत्याही कठीण परिस्थितीत विचार सकारात्मक ठेवणे शक्य होते. ही सहाय्यक उपचार पद्धती असली तरी पुण्यातील एका इस्पितळात त्यासाठी वेगळ्या खाटा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.पुढील काळ संगीत उपचाराचा असेल. सकारात्मक विचार असतील तर रोगी लवकर बरा होण्यास मदत होते.
उपचार करताना ध्वनी स्नान व ध्वनी ध्यान यांचा वापर केला जातो. व्याख्यान ऐकण्यास उत्सुक श्रोत्यांना संगीत उपचाराची चांगली ओळख त्यामुळे झाली. व्याख्यानाला सी ए प्रवीण चव्हाण, बी पी टी मधील निवृत्त अधिकारी विनोद गोलतकर, दत्तात्रय पारखी पंचगव्य चिकित्सक व इतर श्रोते मोठ्या संख्येने ऑनलाईन हजर होते. व्याख्यान जवळ जवळ दोन तास चालू होते.किशोर गोलतकर हे ह्या वर्षी सृजनशील संगितोपचार साधक 2023 चे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
किशोर सरांनी मुद्दाम नमूद केले की ते संगीत उपचाराच्या जोडीला अक्यूप्रेशर योगमुद्रा योग व आयुर्वेद यांचाही वापर करीत असल्यामुळे त्यांचे रोगी बरे होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. मंद बुद्धीच्या मुलांवर संगीत उपचार करतो तेंव्हा त्या मुलांमध्ये झालेली प्रगती मला खूप समाधान देते असे त्यांनी आवर्जून सांगितले. किशोर सर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्मरणशक्ती व समुपदेशन सल्ला देतात. कोणत्याही व्यक्तीचे दोन्ही मेंदू सक्रिय असतील तर व्यक्ती सृजनशील होते व त्यासाठी संगीत उपचार सहाय्यक ठरतात असे व्याख्यानातून लक्षात आले. विद्यार्थीदशेत असताना घेतलेले संगीत उपचार पुढे खूप फायदेशीर ठरतात असे त्यांनी सांगितले. हे कार्य सर समाजसेवा म्हणून करीत असल्यामुळे अगदी माफक फी आकारून साठ दिवसांचा कोर्स दिला जातो.
विद्यार्थी कलाकार व इतरही रोग्यांसाठी संगीत उपचार संजीवनी ठरत आहेत.
सरांनी शेवटी सांगितले की
गाना आये या ना आये गाना चाहिए l
तुम्हाला गाणे गाता येवो अगर न येवो सर्वांनी गाणे गायचा प्रयत्न करावा.स्वतः गाणे गाण्याचा देखील खूप फायदा होतो. ह्या धकाधकीच्या युगात जवळ जवळ सर्वांनाच संगीत उपचारांची गरज आहे. सर साठ दिवसांच्या कोर्सची फक्त 1500 रुपये फी आकारत आहेत. म्हणजे प्रती दिवस फक्त एक कपभर चहाची किंमत 25 रुपये इतकी माफक.
संगीत ऐकून गायींचे दूध वाढते ,वनस्पतीची वाढ चांगली होते तर मनुष्याला फायदा का नाही होणार ? ताणतणाव व्यवस्थापन शरारिक व मानसिक आजार यासाठी संगीत उपचार तज्ञ किशोर गोलतकर यांचा नंबर खाली देत आहे. आपल्या कोणत्याही आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण ते नक्की करतील.
किशोर गोलतकर
मुंबई 9869321068

वृत्तांकन :
विलास कुलकर्णी
( आप्पा महाराज )
जनसंपर्क अधिकारी
जागतिक साकव्य मंच समूह
7506848664

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा