You are currently viewing १९३ सरपंच तर ९१० सदस्य पदासाठी दिवसभरात अर्ज

१९३ सरपंच तर ९१० सदस्य पदासाठी दिवसभरात अर्ज

आजगावं, गेळे, नेतर्डे, तांबुळो येथे सरपंच पदासाठी एकच अर्ज

सावंतवाडी :

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून ५२ ग्रामपंचायत निवडणूका होवू घातल्या आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आज संपली. शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी १९३ तर सदस्य पदासाठी ९१० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आजगाव, गेळे, नेतर्डे, तांबुळी येथून सरपंच पदासाठी केवळ १ अर्ज आल्यानं सरपंच निवड बिनविरोध होणार आहे. तर सरपंच पदासाठी सातोसे मधून ९ न्हावेलीतून ८ डेगवे ७, चराठे, सातार्डा, सोनुर्ली, तळवणे, वेर्ले, विलवडेतून ६ असे सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

येत्या १८ डिसेंबर रोजी या ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. या नामनिर्देशन पत्रांची छाननी ५ डिसेंबर रोजी व उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ७ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. या निवडणुकीच मतदान १८ डिसेंबर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तर मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे. 52 ग्रामपंचायतीसाठी शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी १९३ तर ९१० जणांनी सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल केली आहेत. या निवडणुकीत आजगाव, आंबेगाव, असनिये, बांदा, भालावल, भोमवाडी, चराठे, डेगवे, देवसू दाणोली, धाकोरे, गेळे, गुळदूवे, कलंबिस्त, कारीवडे, कास, कवठणी, केसरी फणसवडे, किनळे, कोनशी दाभीळ, कुडतरकरटेंब सावरवाड, कुणकेरी, माडखोल, मडुरा, माजगाव, नाणोस, नेमळे, नेतर्डे, न्हावेली, निगुडे, निरवडे, ओटवणे, ओवळीये, पाडलोस, पडवे-माजगाव, पारपोली, रोणापाल, सांगेली, सरमळे, सातार्डा, साटेली तर्फ सातार्डा, सातोसे, सातुळी बावळाट, शेर्ले, शिरशिंगे, सोनुर्ली, तळवणे, तांबुळी, तिरोडा, वाफोली, वेर्ले, वेत्ये, विलवडे या ५२ ग्रामपंचायत निवडणूका होत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 13 =