पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव; पहिल्या प्रवाशाला बोर्डिंग पासचे वितरण
‘यापुढे विमानसेवा कधीही बंद पडणार नाही’; पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही
पर्यटन विकासासह स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार; जिल्ह्याला राज्यातील पहिल्या तीन जिल्ह्यांत आणण्याचा निर्धार
सिंधुदुर्ग : दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हावासीयांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून मुंबईकडे जाणारी विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याने जिल्ह्याच्या दळणवळण आणि पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली आहे. फ्लाय ९१ कंपनीच्या विमानसेवेच्या पुनर्प्रारंभानिमित्त विमानतळावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ढोल-ताशांच्या गजरात मुंबईहून आलेल्या प्रवाशांचे औक्षण करून पुष्पगुच्छ आणि मिठाई देत स्वागत करण्यात आले. पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या पहिल्या प्रवाशाला त्यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला. ही विमानसेवा भविष्यात कोणत्याही परिस्थितीत बंद पडू दिली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर आयोजित शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, प्रभाकर सावंत, अबीद नाईक, बंड्या नारकर, निलेश सामंत, कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, आनंद शिरवलकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर उज्ज्वल व्हावा, जिल्ह्यातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याची आर्थिक प्रगती व्हावी, हे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. केंद्र सरकारच्या संबंधित %E
