You are currently viewing सरपंच पदासाठीच्या पोट निवडणुकीत ग्रामविकास आघाडीचे उमेदवार हरी सिताराम वारंग हे अटीतटीच्या लढतीत विक्रमी आघाडीने विजयी…

सरपंच पदासाठीच्या पोट निवडणुकीत ग्रामविकास आघाडीचे उमेदवार हरी सिताराम वारंग हे अटीतटीच्या लढतीत विक्रमी आघाडीने विजयी…

सावंतवाडी

तालुक्यातील गाव निरवडेच्या सरपंच पदासाठी प्रभाग १ मधील नुकत्याच पार पडलेल्या सरपंच पदासाठीच्या पोट निवडणुकीत ग्रामविकास आघाडीचे उमेदवार हरी सिताराम वारंग हे अटीतटीच्या लढतीत विक्रमी आघाडीने विजयी झाले.

माजी सरपंच शंकर ऊर्फ सदा गावडे व उपसरपंच चंद्रकांत गावडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या निवडणुकीत हरी वारंग यांचा १५२ मतांनी विक्रमी विजय झाला.

हरी वारंग यांना ३६४ मते तर त्यांचे प्रतिद्वंदी उमेदवार दत्ताराम गावडे यांना २१२ मते मिळाली.

या मानापमानाच्या निवडणूकीत ग्रामविकास पॅनलच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी अतोनात मेहनत घेतली.

हरी वारंग यांनी मिळविलेल्या या यशाचे कौतुक पंचक्रोशीत तसेच संपूर्ण जिल्हयात होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा