You are currently viewing श्री दत्तमंदिर, तिवरेवाडी, रेडीचा जिर्णोद्धार व कलशारोहण, पार्थिव श्रीदत्तमूर्ती नि पादुका प्राणप्रतिष्ठापणा सोहळा ०२ डिसेंबर ते ०४ डिसेंबर २०२२ रोजी होणार संपन्न

श्री दत्तमंदिर, तिवरेवाडी, रेडीचा जिर्णोद्धार व कलशारोहण, पार्थिव श्रीदत्तमूर्ती नि पादुका प्राणप्रतिष्ठापणा सोहळा ०२ डिसेंबर ते ०४ डिसेंबर २०२२ रोजी होणार संपन्न

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ला तालुक्यातील रेडी, तिवरेवाडी येथील श्री दत्तमंदिर हे फार पूर्वीपासून जागृत देवस्थान म्हणून सर्वांना ज्ञात आहे. सदरचे श्रीदत्ताचे मंदिर जीर्ण झाल्याने तिवरेवाडी ग्रामस्थांनी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम हाती घेतले होते. श्री दत्तगुरुचे भक्तगण, भाविक, दानशूर व्यक्ती आणि ग्रामस्थांच्या सहकार्य व संकल्पनेतून जिर्णोद्धार केला असून मंदिरातील श्री दत्त मूर्ती व पादुका प्राणप्रतिष्ठा त्याच प्रमाणे कलशारोहण आदी धार्मिक विधी दिनांक ०२ डिसेंबर ते दिनांक ०४ डिसेंबर या कालावधीत करण्यात येणार आहेत.

शुक्रवार दिनांक ०२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी यजमान शरीरशुद्धी, प्रायश्चित्त, देवता प्रार्थना, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदिश्राद्ध, आचार्यपूजन, प्राकारशुद्धी, जलाधीवास.

शनिवार दिनांक ०३ डिसेंबर रोजी सकाळी शांतीपाठ, प्राकारशुद्धी, देवता आवाहन, वास्तूयजन, ग्रहयजन, मुख्य देवता हवन.

रविवार दिनांक ०४डिसेंबर रोजी सकाळी शांतिपाठ, प्राकार शुद्धी, आवादित देवता पूजन, सकाळी *११.४९ वाजता शिखर कलश स्थापना, दुपारी १२.३५ वाजता श्री दत्त महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना,* बलिदान, पूर्णाहुती, महाआरती, प्रार्थना, *महाप्रसाद* व सायंकाळी ०५.०० वाजलेपासून भजनादी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

बुधवार दिनांक ०७ डिसेंबर २०२२ रोजी श्री दत्तजयंती निमित्त सकाळी श्री सत्यदत्त महापूजा, दुपारी महाआरती व महाप्रसाद असणार आहे.

दिनांक ०२ डिसेंबर ते ०४ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत असलेल्या मंदिराच्या धार्मिक विधींसाठी भक्तगण, भाविक, ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहून श्रीकृपेचा व नेत्रदीपक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव दत्त मंदिर ट्रस्ट, श्री देव दत्तमंदिर जिर्णोद्धार समिती रेडी, तिवरेवाडी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + fourteen =