You are currently viewing तो तर होता मामा नाना

तो तर होता मामा नाना

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी विनायक जोशी लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*तो तर होता मामा नाना*

बसून असे तो “कट्ट्यावरती”
चेहरा पाडून *शांतपणाने*
संभाषण नव्हते “कोणासंगे”
*अजून* कधीही केले त्याने
//१//
सदा दाखवी *बोट* आकाशी
कुणा काही न येतसे ध्यानी
दाखवी “साडी” पिशवीमधली
“खुणेने” सांगे सांगली मधुनी
//२//
आजी सांगते *समारंभातून*
कर्तव्य आहे माझे नातवाला
घेऊन ठेवली *साडी आधी*
जीवंत नसले तरी नातसुनेला
//३//
घेऊन शाॅक बसली दातखिळी
अजून आहे आजी आजारी
कुणी आणा हो नवरी त्याला
नेसवू साडी तीला *जरतारी*
//४//
कुणी शांताबाई तयार झाली
लग्न मंडपी *उभी* राहिली
*तो* ही राहीला हार घेऊनी
अवचित आली आजी त्यावेळी
//५//
नेसून *साडी* दिसते सुंदर
म्हणू लागली आजी सर्वांना
नव्हती कल्पना अजून कुणाला
*तो तर होता मामा नाना*
//६//

विनायक जोशी 🥳ठाणे
मीलनध्वनी/९३२४३२४१५७
मंगळवार २२ नोव्हेंबर २०२२

प्रतिक्रिया व्यक्त करा