You are currently viewing राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा

राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक श्री.अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

*राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा*

जिजाऊ माँ जगदंबा राष्ट्राची जननी
धन्य जाहली शिवबास जन्म देऊनी।। ध्रु।।

पती राजे होते निजामाचे वीरमणी
भूमिका निभावे आदर्श माता पत्नी
डगमगली ना कधी झुंजार रागिणी।।1।।

पुत्राचे पाय पाळण्यात राहे ओळखुनी
शिवबाला समजावी स्वधर्म कहाणी
बाळगोपाळांना सांगे गोष्टी मर्दानी।।2।।

स्वराज्य स्थापावे ध्यास तिचे मनी स्वप्नि
सुराज्य व्हावे शिवबास शिकवणी
जय जय कार करी म्हणे माय भवानी।।3।।

शिवबा शूर मावळा राहे दुष्टां संहारूनी
प्रजेला सांभाळी सर्व धर्म भावनेनी
जाणता राजा कीर्ती राही संपादूनी।।4।।

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन 410 201.
Cell.9373811677.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 4 =