You are currently viewing बांदा ग्रामपंचायत सरपंच पदावर विराजमान होणार पहिली थेट सरपंच महिला

बांदा ग्रामपंचायत सरपंच पदावर विराजमान होणार पहिली थेट सरपंच महिला

थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत पूर्णवेळ सरपंच पदासाठी देताना तारेवरची कसरत तसेच लोकांच्या वाढलेल्या अपेक्षाही पूर्ण करण्याचे आव्हानही..

 

बांदा :

 

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची तारीख घोषित होताच सर्वच ठिकाणी राजकीय घडामोडीना वेग आला आहे. बांदा ग्रामपंचायत निवडणुकित भाजप विरुद्ध गाव विकास पॅनेल अशी निवडणूक रंगणार आहे. मात्र सर्वांचे लक्ष असणार आहे ते थेट होणाऱ्या सरपंच निवडणुकीवर.

बांदा ग्रामपंचायत सरपंच पद यावेळी ओबीसी महिला राखीव असल्याने प्रथम महिला थेट सरपंच म्हणून विराजमान होणार आहे. तर ग्रामपंचायत इतिहासात तिसरी महिला सरपंच म्हणून निवडून येणाऱ्या महिलेला मान मिळणार आहे.

बांदा सरपंच पदी थेट सरपंच म्हणून पहिल्यांदा मंदार कल्याणकर निवडून आले होते. तर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अक्रम खान हे निवडून आले होते. सरपंच पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर अक्रम खान यांनी बांदा ग्रामपंचायत अतिशय दर्जेदार काम केले आहे. ग्रामपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता असतानाही सरपंच अक्रम खान यांनी विरोधी सदस्यांनाही सोबत घेत विकास कामे केली आहेत. त्यामुळे बांदा ग्रामपंचायतीला पुरस्कारही मिळाला आहे. या ग्रामपंचायतीने गेल्या पाच वर्षात केलेल्या अनेक उपक्रमांमुळे राज्यातही या ग्रामपंचायतीची चर्चा होती.

दरम्यान आता या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत महिला सरपंचपदी विराजमान होणार असल्यान सरपंच अक्रम खान यांनी केलेल्या कामाचा आलेख उंचावण्याचे आव्हान असणार आहे. या निवडणुकीत पूर्णवेळ सरपंच पदासाठी देताना तारेवरची कसरत करावी लागणार असून लोकांच्या वाढलेल्या अपेक्षाही पूर्ण करण्यासाचे आव्हानही पेलावे लागणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − twelve =