You are currently viewing मनोहर पवार यांना ग्लोबल स्कॉलर फाऊंडेशन पुणे चा ‘जिल्हा भूषण पुरस्कार ‘जाहीर

मनोहर पवार यांना ग्लोबल स्कॉलर फाऊंडेशन पुणे चा ‘जिल्हा भूषण पुरस्कार ‘जाहीर

 

चिखली येथून जवळच असलेल्या केळवद गावचे साहित्यिक ‘ कवी ‘ शाहीर मनोहर पवार यांना यावर्षीचा ग्लोबल स्कॉलर फाऊंडेशन पुणे या संस्थे मार्फत देणात येणारा मानाचा ‘ जिल्हा भूषण पुरस्कार ‘ जाहिर झाला आहे .

मनोहर पवार केळवदकर यांना ग्लोबल स्कॉलर फाऊंडेशन पुणे चे अध्यक्ष सुनिल बेळगावे याचे पत्र प्राप्त झाले आहे . साहित्यिक क्षेत्रात ‘ सामाजिक क्षेत्रात ‘ तसेच शाहीरी कलेच्या माध्यमातून मनोहर पवार यांनी ‘ व्यसनमुक्ती ‘ भ्रृणहत्या ‘ तृतीय पंथ हक्क ‘ कामगार बालमजुर ‘ कौटुंबिक कलह ‘ स्वच्छता अभियान ‘ शेतकरी समुदेशन ‘ पाणी वाचवा ‘ जलसाक्षरता ‘ वृक्षारोपन ‘ अंधश्रध्दा ‘ मानवाधिकार ‘ तसेच कोरोणा मास अभियान कार्यशाळा मेळावे ‘ अंतर्गत त्यांनी आपल्या आपल्या कार्याव्दारे ‘ शाहीरी प्रबोधनाच्या माध्यमातून विविध योजना व प्रबोधन कलेच्या माध्यमातून ‘ जन जाग्रती करीत आहे . साहित्य संमेलने आयोजित करणे तसेच कविसंमेलन यात सहभाग ‘ घेणे साहित्य वाचन संस्कृती चळवळ चालविणे . उपक्रम घेणे सुरु असून महाराष्ट्रभर ‘ गोवा ‘ गुजरात ‘ दिल्ली ‘ पंजाब आदी राज्याबाहेरील ठिकाणी त्यांनी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सहभाग नोदविला आहे . विविध दिवाळी अंक वृतपत्रे ‘ दैनिके साप्ताहिके मासिके यात त्यांचे साहित्य नियमित प्रकाशित होत असून त्यांचे काव्यसंग्रहही प्रकाशीत होत आहे . त्यांना यापूर्वीही राज्यभरातून विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून मानकरी ठरले आहेत .
सदर ‘जिल्हा कला भूषण ‘ पुरस्कार वितरण ‘ हे शाहीर अन्नाभाऊ साठे ऑ डेटेरियम हॉल पुणे या ठिकाणी होत असून पद्मश्री मा.पोपटराव पवार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देणात येणार आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 10 =