You are currently viewing सारथीच्या योजनांच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत

सारथीच्या योजनांच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी मार्फत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी  विद्यार्थ्यांनी  अर्ज  पोस्टव्दारे  30 नोव्हेंबर  अखेर पर्यंत पाठवावेत, असे आवाहन सारथी उपकेंद्र कोल्हापूरच्या सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांनी केले आहे.

              डॉ.पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती, Mpsc Mains Sponsorship,Probationary Officer/Clerical Staff Banking,Mpsc (CJJD & JMFC) ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज अद्याप भरले नाहीत. त्यांनी ते विहित मुदतीत भरावेत व ज्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यांनी त्यांच्या अर्जाच्या प्रती आवश्यक त्या कागदपत्रांच्य छायांकीत प्रतींसहीत छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे, बालचित्रवाणी आगरकड रोड शिवाजीनगर पुणे 411004 या पत्यावर दि. 30 नोव्हेंबर अखेर पर्यंत सादर करावित.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 17 =