You are currently viewing गांगेश्वर मित्रमंडळाचे कार्य कौतुकास्पद ; कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद – समीर नलावडे

गांगेश्वर मित्रमंडळाचे कार्य कौतुकास्पद ; कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद – समीर नलावडे

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा गांगेश्वर मित्रमंडळ तर्फे सत्कार

कणकवली

दोन वर्षे कोरोना काळामुळे सारे सण उत्सव साधेपणाने साजरे करावे लागले होते. पण यावर्षी संकट टळल्याने सरकारने सर्व सण निर्बंधमुक्त मुक्त केले आहेत. त्याचे प्रत्यंतर यावर्षी साजरे झालेल्या सणांवरून दिसून आले. तसेच आता कोरोना काळ टळल्याने सर्व नागरिक उत्साहाने व वाजतगाजत सर्व सण उत्सव साजरे करत आहेत.

यामुळे गांगेश्वर मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने कोरोना काळानंतर नवरात्र हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, या कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित नवरात्र उत्सवसाठी सर्व राजकीय नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक व व्यापारी यांनी आपल्या परीने मदत केली. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी संगीत खुर्ची खेळत आनंद साजरा केला जातो.

या नवरात्रोत्सवसाठी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक सुशांत नाईक, संजय कामतेकर, ॲड.विराज भोसले, शिशिर परुळेकर, नगरसेविका माही परुळेकर, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, प्रदीप मांजरेकर, सुजीत जाधव, निलेश गोवेकर आदींनी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रम संपन्न होण्यासाठी मंडळाचे परेश परब, चानी जाधव, योगेश जाधव, रामदास मांजरेकर, सागर राणे, रोशन जाधव, राहुल वालावलकर, तेजस परब, रोहित जाधव, अमित जाधव, रोहित सरगर, रोशन जाधव, अक्षय खरात, प्रथमेश जाधव आदींनी मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा