You are currently viewing सोशल क्लबच्या नावावर सिंधुदुर्गात जुगार

सोशल क्लबच्या नावावर सिंधुदुर्गात जुगार

कणकवलीत पोलिसांचा छापा

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन आणि विकास या संकल्पना घेऊन उदयास येत असतानाच अवैध धंद्यांचा केंद्रबिंदू देखील बनत चालला आहे. दारू, मटका, चरस, गांजा आदींचा जिल्ह्यात सुळसुळाट झाला असून जुगाराच्या तर मैफिली झडत आहेत. जुगाराच्या बैठकांबाबत तक्रारी वाढल्यानंतर पोलिसांचे छापे पडतात म्हणून जिल्ह्यात “सोशल क्लब” या गोंडस नावावर राजरोसपणे जुगाराचे अड्डे चालवले जात आहेत आणि या अड्ड्यांना देखील खाकीचा छुपा पाठिंबा असल्याने पोलिसांनी छापा जरी टाकला तर अगोदरच जुगार बंद होतात आणि छाप्यात काहीही सापडत नाही.
कणकवलीत सुरू असलेल्या अशाच एका सोशल क्लब वर जुगार सुरू असल्याची तक्रार आल्यानें पोलिसांनी तात्काळ छापा टाकला होता. परंतु पोलीस पोचायच्या आतच सोशल क्लब मालकाला पोलीस छाप्याची खबर पोचली त्यामुळे छापा टाकूनही कामगार व्यतिरिक्त सोशल क्लब मध्ये काही आढळून आलं नाही. त्यामुळे छापा पडतो ही खबर पोचविणारा खाकी वर्दीमध्ये देखील कोणीतरी छुपा रुस्तम असल्याचे समोर आले आहे.
सोशल क्लब या गोंडस नावाखाली विशेषतः कणकवली आणि मालवण मध्ये जुगाराचे अड्डे जास्त प्रमाणात चालतात, त्यामुळे अशा जुगाराच्या राजरोस चालणाऱ्या अड्यांवर युवकांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो त्यामुळे जिल्ह्यातील युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. युवकांच्या भवितव्याचा विषय चिंतेचा बनल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याचे पालक म्हणून या सोशल क्लब जुगार अड्ड्यांची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. जिल्ह्याची होत असलेली बदनामी आणि युवा पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी पालकमंत्री ठोस पाऊल उचलतील अशी आशा जिल्हावासीयांना वाटत आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 9 =