You are currently viewing मालवण नगर परिषदेच्या वतीने “आमचा मालवण” अभियानाच्या आयोजनाने लोकसहभागातून शहर विकासाचा संकल्प

मालवण नगर परिषदेच्या वतीने “आमचा मालवण” अभियानाच्या आयोजनाने लोकसहभागातून शहर विकासाचा संकल्प

मालवण:

देशातील सर्व शहरे कचरामुक्त करणे, घनकचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, हागणदारी मुक्त शहरे, शाश्वत स्वच्छता इ. गोष्टी लोकसहभागाने साध्य करण्यासाठी भारतl सरकारने स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी केली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने शहरे स्वच्छ झाली तरच सुंदर दिसतील या उद्देशाने राज्यातील शहरांमध्ये “शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022” आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने मालवण नगरपरिषदेच्या वतीने “आमचा मालवण” अभियान संपूर्ण शहरात राबविले जाणार आहे. या अभियानामध्ये लोकसहभागातून सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी मालवण नगरपरिषदेतर्फे शहरात दि. 25 नोव्हेंबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत “आमचा मालवण” या शहरव्यापी मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील मुख्य ठिकाणांचे सौंदर्यीकरण व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

शहर सौंदर्यीकरण स्पर्धेसोबत मालवण नगर परिषदेकडून देखील न.प. हद्दीमध्ये विविध ठिकाणी खालीलप्रमाणे सुशोभीकरण व सौंदर्यकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

शहरातील मुख्य चौक सुशोभीकरण, उद्याने अस्तित्वातील कारंजा नूतनीकरण, ब्रिजचे रंगकाम ,न.प. विहिरींचे सौंदर्यीकरण, शहरातील ऐतिहासिक व प्रमुख वारसा स्थळांचे सुशोभीकरण, न.प. हद्दीतील विविध सार्वजनिक परिसर विद्युत रोषणाई करणे., Street furniture एकसंधता, शहरातील सार्व. ठिकाणे, भिंती दर्शनी भाग, भिंती इ.स्वच्छता व जनजागृती विषयक संदेश लिहिणे., आकर्षक 3D पेंटिंग, रॉकपेंटिंग ,नाट्यगृह येथे म्युरल/स्कलपचर आर्ट्स डिझाईन करणे., GVP ठिकाणाजवळ Vertical Garden गार्डन तयार करणे.
वरीलप्रमाणे कामे मालवण नगर परिषदेमार्फत श्री संतोष जिरगे साहेब, मा. मुख्य अधिकारी तथा प्रशासक यांच्या मंजुरी व मार्गदर्शनाखालील करण्यात येणार आहेत.

त्याच धर्तीवर मालवण नगर परिषदेने आयोजित केलेल्या आमचा मालवण या अभियाना अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे त्याचा सविस्तर पुढीलप्रमाणे आहे

स्वमालकीची विहीर, सुशोभीकरण स्पर्धा, पटनाट्य स्पर्धा ,लोगो डिझाईन स्पर्धा, स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज, उत्कृष्ट सफाई कर्मचारी, स्वच्छ हॉटेल स्पर्धा, वेस्ट टू वंडर स्पर्धा ,स्वच्छ शाळा स्पर्धा, चॅम्पियन स्पर्धा, स्वच्छ आरोग्य (दवाखाने रुग्णालय) सुविधा, जिंगल स्पर्धा, स्वच्छ निवासी संकुल स्पर्धा, इंस्टाग्राम फेसबुक रील्स मेकिंग स्पर्धा स्वच्छ शासकीय कार्यालय स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा, स्वच्छ सलून ,भिंती सुशोभीकरण स्पर्धा, स्वच्छ ब्युटीपार्लर स्पर्धा, सर्वोत्कृष्ट बचत गट स्पर्धा.

मालवण शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने येथील पर्यटनास चालना मिळावी या हेतूने शहराची स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सुशोभीकरण, शहराचा समृद्ध इतिहास, येथील कला, सांस्कृतिक वारसा या घटकांना उजाळा देण्याच्या अनुषंगाने अशा स्वरूपाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचा उद्देश शहरातील सर्व नागरिक, सेवाभावी संस्था, व्यवसायिक, उद्योजन, शिक्षण संस्था, महिला, पत्रकार या सर्वांना सहभागी करून कचरामुक्त शहरांचे ध्येय साध्य करण्याकरिता लोकचळवळ तीव्र करणे आणि स्वच्छ वर्तन आणि संबंधित कृती संस्थात्मक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांपर्यंत पोहोचून शहरात जागरूकता निर्माण करणे हा आहे.

सर्व अठरा स्पर्धांसाठीची स्पर्धक नोंदणी दिनांक 25 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. स्पर्धक नोंदणी प्रत्यक्ष नगर परिषद येथे तसेच गुगल फॉर्म द्वारे ऑनलाईनसुद्धा करता येईल. या सर्व स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणारऱ्या स्पर्धकांना रोखबक्षिसे, सन्मानचिन्हे व प्रशस्तीपत्रके देऊन मालवण नगर परिषदेकडून गौरविले जाणार आहे.

“आमचा मालवण” या अभियानांतर्गत आयोजित केलेल्या स्वच्छ स्पर्धाद्वारे शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, हॉटेल्स, शासकीय कार्यालये, रहिवासी संकुले, केशकर्तनालये, महिलांचे ब्युटी पार्लर या सगळ्यांचे स्वच्छते बाबतच्या विविध निकषांच्या आधारे परीक्षण केले जाणार आहे.

मालवण नगर परिषदेने यावर्षी विविध स्पर्धांचे, स्वच्छता अभियानांचे, जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करून देशपातळीवर आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. संतोष जिरगे यांनी “आमचा मालवण” या अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सर्व मालवणवासीयांना केले आहे. या अभियानाच्या आयोजनातून शहरातील नागरिक, सेवाभावी संस्था, विद्यार्थी, महिला या सर्वांच्या सहकार्यातून व नागरिकांच्या शहराबाबतच्या योगदानासाठी त्यांचा सन्मान करून एक स्वच्छ व सुंदर मालवण घडविण्याचा हेतू असल्याचे श्री.संतोष जिरगे, मुख्याधिकारी तथा प्रशासक मालवण नगरपरिषद यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =