You are currently viewing महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा कडुन आगीत बेचिराख झालेल्या मच्छिमारांना मदत

महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा कडुन आगीत बेचिराख झालेल्या मच्छिमारांना मदत

महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा कडुन आगीत बेचिराख झालेल्या मच्छिमारांना मदत

शिरोडा:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा केरवाडी येथील मच्छीमार प्रवीण परब यांच्या होडी,मासेमारीचे साहित्य,जाळे आणी पर्सशीन जाळीला आग लागून फार मोठे नुकसान झाले होते.प्रवीण परब या मच्छिमार यांच्या मदतीला भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब हे धावून आले आहे.विशाल परब यांनी आज शिरोडा केरवाडा येथील या घटनास्थळी भेट देत पाहणी केली. आणी प्रवीण परब या मच्छिमाराला तब्बल पन्नास रूपयांची रोख स्वरूपात आर्थिक मदत तत्काळ केली आहे.शिरोडा येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले होते. या आगीत पर्ससीन जाळे आणी होडी जळून खाक झाले होते.या आगीच्या दुर्घटनेत जवळपास 30 लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले होते.दिवाळीच्या सणाच्या गडबडीत असल्याने ही आग लक्षात आली नव्हती.प्रवीण परब या मच्छिमारांवर ऐन दिवाळीत फार मोठ आर्थिक संकट ओढावल होत. ही घटना समजतात भाजपचे प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या माध्यमातून माहिती घेतली.आणी आज तत्काळ धाव घेत मदतीची हाक देत धीर दिला आहे.यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब,प्रथमेश राजन तेली,माजी शिक्षण आरोग्य सभापती प्रितेश राऊळ,प्रथमेश कामत यासह भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते,मच्छिमार उपस्थित होते.विशाल परब यांच्या या औदार्याचे शिरोडा पंचक्रोशीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कौतुक होत आहे.तर मच्छिमार बांधवांनी आणि प्रवीण परब यांच्या कुटुबियांनी विशाल परब यांचे धन्यवाद व्यक्त केले आहेत.
या वेळी भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब,प्रथमेश तेली, त्यांच्या सोबत शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर,शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे,शिरोडा ग्रामपंचायत विदयमान सदस्य सुधीर नार्वेकर,मयूरेश शिरोडकर भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी, भाजप शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत,विदयमान आरवली सरपंच समीर कांबळी, शिरोडा ग्रामपंचायत माजी सदस्य तातोबा चोपडेकर,शिरोडा केरवाडी येथील मच्छीमार ग्रामस्थ प्रशांत बटा,सत्यविजय पेडणेकर,सदाशिव तारी,सुहास निकम,सावळाराम बटा,संदेश सावंत,देविदास कुबल,वासू तारी,प्रमोद मोठे,गोपाळ बटा,तृप्तेश चोडणकर,भाई घाटवळ, आणी इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा