You are currently viewing जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी

राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान संधी, समान हक्क असे मूलभूतअधिकार दिलेले आहेत. समस्यग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्या तक्रारी /अडचणीचे निराकरण करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.

            माहे-नोव्हेंबर 2022 मधील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि. 21/11/2022 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. समस्यग्रस्त व पिडीत महिलांनी आपले प्रश्न मांडून त्यांचे हक्काचे संरक्षण व्हावे व त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणी याची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक होण्यासाठी महिला लोकशाही दिन हा उत्तम मार्ग आहे.

समस्यग्रस्त व पिडीत महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, दालन क्र. 106, ए-ब्लॉक, तळमजला, सिंधुदुर्गनगरी येथे उपलब्ध करुन घ्यावेत.

अर्ज स्विकृतीचे निकष :  अर्ज विहित नमुन्यात असावा, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा.

अर्ज न स्विकृतीचे निकष : न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसलेले अर्ज.

समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा