You are currently viewing आ. नितेश राणे यांचा मच्छीमारांनी केला सत्कार, 120 अश्वशक्तीच्या मच्छीमारी नौकांना डिझेल कोटा मंजूर

आ. नितेश राणे यांचा मच्छीमारांनी केला सत्कार, 120 अश्वशक्तीच्या मच्छीमारी नौकांना डिझेल कोटा मंजूर

देवगड :

 

आज देवगड दौऱ्यावर आलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांचा मच्छिमारांनी राणे यांच्या प्रयत्नांतून शिंदे – फडणवीस सरकारने १२० अश्वशक्ती इंजिनच्या नौकांना डिझेल कोटा मंजूर झाल्याबद्दल शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करीत आभार मानले.

१२० अश्वशक्तीच्या बोटींचा‌ VAT परतावा २००८ पासून  मिळणे बंद झाले होते. मात्र आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदेश काढून हा परतावा पुन्हा सुरू केला आहे. त्या बद्दल मच्छीमारांनी आ. राणेंच्या देवगड दौऱ्यात त्यांचा सत्कार केला. यामध्ये मच्छीमार नेते उमेश आंबेरकर, दत्तप्रसाद भिल्लारे, जगदीश कोयंडे, शामराव पाटील, सचिन आरेकर, सुशांत प्रभु, उमेश कदम, उमेश मोहिते, भाऊ कुबल, मंदार धरत, विघ्नेश्वर प्रभु, चंद्रकांत पाळेकर, धर्मराज जोशी, प्रसाद कांळगावकर आदींचा समावेश होता. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस, बाळ खडपे, संदिप साटम, योगेश चांदोस्कर, शरद ठूकरूल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − nine =