You are currently viewing इचलकरंजीत बुधवारी ॲड.दिलशाद मुजावर यांचे व्याख्यान

इचलकरंजीत बुधवारी ॲड.दिलशाद मुजावर यांचे व्याख्यान

इचलकरंजीत बुधवारी ॲड.दिलशाद मुजावर यांचे व्याख्यान

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथे रोटरी क्लब ऑफ सेंट्रल , श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्त्या ॲड. दिलशाद मुजावर यांचे जाणून घेऊ तृतीयपंथीचे अंतरंग या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.हे व्याख्यान बुधवार दि.१६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्रात होणार आहे

इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्त्या ॲड.दिलशाद मुजावर या राज्य शासनाच्या तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत.या माध्यमातून त्यांनी तृतीयपंथींच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवतानाच त्यांना मुलभूत न्याय हक्क मिळवून देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहेत.त्यामुळे तृतीयपंथींचे मूळ प्रश्न काय आहेत , याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा असायला हवा अशा अनुषंगाने व्याख्यान व विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करत आहेत.यासाठी त्यांना शासन , सामाजिक संस्था व संघटनांचे देखील चांगले सहकार्य मिळत आहे.याचा परिणाम , तृतीयपंथींना त्यांच्या हक्काची जाणीव होतानाच शासनाच्या मदतीतून विविध उद्योग – व्यवसाय सुरु करत स्वावलंबी होण्याचा त्यांचा प्रयत्न सामाजिक परिवर्तन कार्यात मोठी भर घालणारा ठरत आहे.याच अनुषंगाने इचलकरंजी येथे रोटरी क्लब ऑफ सेंट्रल , श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्त्या ॲड. दिलशाद मुजावर यांचे जाणून घेऊ तृतीयपंथीचे अंतरंग या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.हे व्याख्यान बुधवार दि.१६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्रात होणार आहे.यावेळी इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तरी या व्याख्यान कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे , असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =