You are currently viewing सावंतवाडी ते कवठणी मार्गे तळवणे बस सुरू करण्याची मागणी

सावंतवाडी ते कवठणी मार्गे तळवणे बस सुरू करण्याची मागणी

संदेश कवठणकर यांचे आगार प्रमुखांना निवेदन

सावंतवाडी :

कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून सावंतवाडी ते कवठण मार्गे तळवणे वेळवेवाडी पर्यंतच्या एसटीच्या सर्व फेऱ्या बंद आहेत. परिणामी कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या येणाऱ्या तसेच कॉलेज व हायस्कूल मध्ये जाणाऱ्या येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची बरीच गैरसोय होतं आहे. त्यामुळे लोकांचे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सावंतवाडी ते तळवणे वेळवेवाडीपर्यतच्या एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू करून सहकार्य करा अशा आशयाचे निवेदन शिवसेना तालुकाप्रमुख (ओबीसी) संदेश कवठणकर यांनी सावंतवाडी एसटी बस आगार प्रमुखांना दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा