You are currently viewing प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा बँक ग्राहकांनी विमा काढणे आवश्यक – विठ्ठल देसाई..

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा बँक ग्राहकांनी विमा काढणे आवश्यक – विठ्ठल देसाई..

वरवडे येथील कै.जयराम सावंत यांच्या कुटुंबीयांना विमा रक्कमेचा धनादेश सुपूर्त

कणकवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील नागरिकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अवघ्या २० रुपयांत आहे.तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा बँकेच्या ग्राहकांनी लाभ घेणे आवश्यक आहे.एखादा अपघात किंवा वाईट प्रसंग आल्यास खूप मदत कुटुंबियांना होत असते. त्यामुळे कमी विमा हप्ता असलेल्या अपघात विमा योजनांचा लाभ घेणे फार महत्त्वाचं असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक विठ्ठल देसाई यांनी केले.

कणकवली येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कणकवली येथे कै.जयराम मधुकर सावंत यांचे अपघाती निधन ९ ऑगस्ट २०२२ रोजी झाले होते.त्याचे बँक खाते जिल्हा बँकेत होते.त्यांनी आपला विमा काढल्याने प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेअंतर्गत दोन लाख रुपये बँक अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाले होते.त्या रक्कमेची मदत त्यांच्या कुटुंबियांना धनादेश स्वरूपात देण्यात आली. विमा रक्कम त्यांच्या पत्नी शुभांगी जयराम सावंत यांना हा धनादेश बँक संचालक विठ्ठल देसाई यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.

यावेळी बँक शाखा व्यवस्थापक सोमा सकपाळ,सहाय्यक शाखा व्यवस्थापक जेमसीन लोबो,प्रभाकर गायकवाड,वीणा रावराणे,वैशाली सावंत,बँक कर्मचारी मिताली पेडणेकर,श्रिया गोसावी,गोविंद सावंत,शिपाई राजू राणे ,श्री. डोंगरे आदीसह कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =