You are currently viewing सेवाभावी वृत्तीचा वस्तुपाठ म्हणजे बॅ.नाथ पै शिक्षण संस्था होय: रूनाल मुल्ला

सेवाभावी वृत्तीचा वस्तुपाठ म्हणजे बॅ.नाथ पै शिक्षण संस्था होय: रूनाल मुल्ला

कुडाळ :

“सिंधुदुर्गवासियांच्यां सेवावृत्तीचा वस्तू पाठ म्हणजे बॅ.नाथ पै शिक्षण संस्था होय. समाजाच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काम करणाऱ्या बॅ. नाथ पे शिक्षण संस्थेचे बॅ. नाथ पै नरसिंग महाविद्यालय , फिजीओथेरेपी कॉलेज यांची कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. देशाच्या लोकशाहीच्या जडणघडणीचा पाया घालणाऱ्या महामानवाच्या जयंतीनिमित्त या आरोग्य शिबिराच्या आयोजनाबाबत व इंगेश हॉस्पिटल या पुन्हा सुरू करण्यासाठी संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांचे कौतुक करत. या सामाजिक कार्यासाठी समाजाने त्यांच्या पाठीशी उभे रहात समाजाने हा सामाजिक बांधिलकीचां वारसा जोपासण्याची गरज आहे.” असे उद्गार कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी काढले. त्या कुडाळ तालुका पत्रकार संघ व बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित कॉलेज ऑफ नर्सिंग आणि कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कुडाळ यांच्यावतीने व लेट मिसेस इंगेटाऊट नाईक(इंगेश हॉस्पिटल) विद्या प्रतिष्ठान मुंबई व बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट कुडाळ .यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूर इंगेश हॉस्पिटल येथे आयोजित जागतिक आरोग्य दिन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक दिवशीय मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “यशवंतराव नाईक यांनी इंगेश हॉस्पिटलच्या रूपाने आपल्या पत्नीच्या चिरस्मृती कायम राहावे यासाठी उभारलेले इंगेश हॉस्पिटल काही कारणामुळे बंदस्थितीमध्ये होते ते ग्रामस्थ व हितचींतकाच्या मदतीने पुनर्जीवित करण्याचं काम उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकार्याने केलेले आहे. ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट असल्याचे सांगितले . ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सुविधा देण्याचे धाडस दाखवण्याचे काम यशवंतराव नाईक यांच्यानंतर इथे उमेश गाळवणकर यांनी केलेले आहे हे काम फारच गौरवास्पद आहे.समाजाच्या चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा यशवंतराव नाईक उमेश गाळवणकर सारखी माणसं त्याचा एक महत्त्वाचा हिस्सा असतात. याचे मुक्तकठाने कौतुक करत आजच्या तरुण पिढीने अशा कार्याची दखल घेऊन पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले ..यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर यशवंतराव नाईक इंगेश हॉस्पिटलचे संचालक प्रकाश नेरुरकर, नेरूर गावच्या सरपंच सौ .भक्ती घाडी, सौ.लक्ष्मी सडवेलकर , तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश जोशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर तसेच नेरूरचे माजी सरपंच चारुदत्त देसाई, सदस्य मंजुनाथ फडके, चंद्रकांत सामंत, कुडाळ तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय पालकर, सदस्य श्री माडगूत, श्री नानाबोगार,उमेश गाळवणकर, अभय सामंत, राजू कलिंगण, सौ व श्री सुंदर गाळवणकर, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सेधु राजा, नरसिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी व मान्यवर उपस्थित होते. या शबिराला शुभेच्छा देताना नेरुरचे माजी सरपंच चारुदत्त देसाई यांनी नेरुर गावच्या सेवेमध्ये वाहिलेली पण बंद स्थितीत असलेली इंगेश हॉस्पिटलची ही इमारत रुग्णसेवेसाठी ज्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेश गाळवणकर यांची जणू काही वाट पाहत असल्याचे जाणवते. यासाठी समाजाने मतभेद विसरून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या गरजेचे प्रतिपादन केले.

तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश जोशी यांनी यशवंतराव नाईक यांनी बांधलेले हे हॉस्पिटल चांगली आरोग्य सेवा देऊ करणाऱ्या बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थे च्या मार्फत सुरू व्हावे ही जणू काही नियतीची इच्छा होती आणि ती आज फलदरूप होते आहे याबद्दल समाधान व्यक्त करीत हॉस्पिटलच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नेरूर गावच्या विद्यमान सरपंच सौ भक्ती घाडी यांनी हे हॉस्पिटल सुरू होणे आणि रुग्णसेवेमध्ये त्याचे योगदान असणे हे नेरुर गावचं एक भूषण असल्याचे प्रतिपादन केलं. परिसा चा लोखंडाला स्पर्श होतात त्याचं सोन्यात रूपांतर होतं. तसंच उमेश यांच्या सेवाभावी वृत्तीने या हॉस्पिटलच्या परिसराचे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नक्कीच रूपांतर होईल .यासाठी त्यांनी कलेश्वर कडे प्रार्थनाही केली. डॉक्टर नवांगुळ यांनी इंगेश हॉस्पिटल हे नव्याने सुरू करण्यासाठी चा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे नमूद करत लक्ष्मी आणि सरस्वती यांच्यामार्फत एक आरोग्यदायी प्रकाशाचे दालन या हॉस्पिटलच्या रूपाने सर्व सामान्यांसाठी खुले होत आहे; यासाठी समाधान व्यक्त करीत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेला शुभेच्छा दिल्या.

आरोग्याच्या पुनर्सेवेमध्ये समाविष्ट करण्याच्या इंगेश हॉस्पिटलच्या शिबिरास जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई सहित बंड्या सावंत, विनायक राणे ,माजी सभापती वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचें संचालक दिलीप रावराणे इत्यादीं सदिच्छा भेट दिली.

या शिबिरामध्ये फिजीओथेरपी व नर्सिंग इत्यादी मार्फत एकूण शंभर (१००) रुग्णांनी विविध तपासण्या व उपचारांचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.

या शिबिराच्या एकूण आयोजनामध्ये पीजीओथेरपी कॉलेजचे विविध डॉक्टर्स, प्राध्यापक, नर्सिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक, नर्सेस व शिक्षण संस्थेचे विविध विभागाचे कर्मचारी, नेरूर गावचे ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले.

या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमन करांगलें यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + ten =