You are currently viewing मदर तेरेसा स्कूल दोन मुलींची राज्यस्तरावर निवड

मदर तेरेसा स्कूल दोन मुलींची राज्यस्तरावर निवड

वेंगुर्ला

सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १५ वर्षाखालील मुलींच्या जिल्हा संघ निवडीत मदर तेरेसा स्कूलची कु. इशिता फर्नांडिस हिची निवड झाली. ती पुणे येथे होणा-या क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्गच्या संघातून खेळणार आहे. तसेच सब ज्युनिअर इंटर झोनल व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात कु. साक्षी शेट्टी हिची सिंधुदुर्ग संघात निवड झाल्यानंतर सांगली येथे झालेल्या विभागीय निवड चाचणीत तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. ती आता चंद्रपूर येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेत खेळणार आहे.

या दोन्ही मुलींच्या यशाबद्दल मुख्याध्यापक फादर अँथोनी डिसोजा यांनी अभिनंदन केले. तसेच शिक्षक, कर्मचारी व पालक यांनी कौतुक केले. इशिता हिस तिचे वडील मारियान फर्नांडिस यांचे मार्गदर्शन लाभले. तर साक्षी हिला निलेश चमणकर, राधाकृष्ण पेडणेकर, सॅमसंग फर्नांडिस यांचे तसेच या दोन्ही मुलींना शाळेचे क्रिडा शिक्षक संदेश रेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा