You are currently viewing अनघ चांदणे…!

अनघ चांदणे…!

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे सदस्या लेखिका कवयित्री सौ स्वाती गोखले लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*अनघ चांदणे…!*

अनघ चांदणे
दिसते निळ्याशार अंबरात
हसून पाहात
सारीकडे…

निशा नेसली
काळी चंद्रकळा ठिपक्यांची
अनघ चांदण्यांची
मोहमयी…

पौर्णिमेस दिसतो
उगवतो आकाशी चंद्रमा
चांदण्यांचा महिमा
अनघ…

आभाळाच्या गालिच्यावर
नक्षी अनघ चांदण्यांची
रेखाटली कलाकुसरीची
वेलबुट्टी…

कृष्णधवल रजतपटावर
आकाशी चांदण्यांची बरसात
सुंदर चांदरात
अनघ…

सौ.स्वाती गोखले.
पुणे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 4 =