You are currently viewing सावंतवाडीत १० नोव्हेंबरला कुमार व कुमारी कबड्डी संघाची मैदानी चाचणी

सावंतवाडीत १० नोव्हेंबरला कुमार व कुमारी कबड्डी संघाची मैदानी चाचणी

सावंतवाडी

सावंतवाडी येथील तालुका कबड्डी असोसिएशनतर्फे गुरुवारी (ता. १०) दुपारी साडेचारला आरपीडी हायस्कूलच्या मैदानावर कुमार व कुमारी कबड्डी संघाची मैदान चाचणी घेण्यात येणार आहे. १३ ला वेंगुर्ले येथे होणाऱ्या जिल्हास्तर कुमार-कुमारी गट अजिंक्यपद स्पर्धेत स सहभागी होणारे सावंतवाडी तालुका कबड्डी संघ निवडले जाणार आहेत.

या स्पर्धेसाठी कुमार गट मुलगे
वजन ७० किलो तर कुमारी गट
मुलींसाठी वजन ६५ किलो राहील. दोन्ही गटांसाठी वयोमर्यादा वीस वर्षांखालील जन्मतारीख एक जानेवारी २००३ व त्यानंतर जन्मलेले ग्राह्य धरली जाणार आहे.

जन्मतारीख निश्चित करण्यासाठी संबंधित खेळाडूचे व एक वर्षापर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला, वय किमान पाच वर्षापर्यंत असतानाचे संबंधित शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला, संबंधित खेळाडूच्या वयाची सहा वर्ष पूर्ण झाल्यावर पहिली इयत्तेत प्रवेशाची जनरल रजिस्टरची प्रत अनिवार्य आहे. आधार कार्ड अनिवार्य असून सर्व ठिकाणी नमूद जन्मतारीख एकच असावी. अन्यथा त्याला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.अधिक माहितीसाठी मार्टिन अल्मेडा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सचिव शैलेश नाईक यांनी केले आहे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 7 =