You are currently viewing बाईपण भारी देवा’ चित्रपटाची तब्बल ३७.३५ कोटींची कमाई

बाईपण भारी देवा’ चित्रपटाची तब्बल ३७.३५ कोटींची कमाई

*’बाईपण भारी देवा’ चित्रपटाची तब्बल ३७.३५ कोटींची कमाई*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि  केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटानं प्रदर्शना आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता.  सहा बहिणींच्या कथेच्या माध्यमातून ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटानं प्रत्येक स्त्रीला जगण्याचा नवा अर्थ देत स्वतःसाठी जगायला शिकवलं. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर त्याची सुरू असलेली घोडदौड प्रेक्षकांच्या पसंतीची मोठी पोचपावती म्हणावी लागेल. हा चित्रपट प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासोबतच नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवताना दिसत आहे.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर तब्बल १२.५० कोटींची कमाई केली होती. इतकंच नाही तर प्रदर्शनाच्या दुसऱ्याच रविवारी एका दिवसांत ६.१० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. तर दुसऱ्या आठवड्यात २४.८५ कोटींचा गल्ला जमवत एकूण ३७.३५ कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवडयाची कमाई दुपटीने वाढली आहे.  चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असले तरी थिएटरमधील गर्दी ओसरलेली दिसत नाही.  चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकवर्गाकडून मिळणारी प्रसिद्धी पाहता तिसऱ्या आठवड्यातही आपली हुकमत कायम ठेवत, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपलं नाणं खणखणीत वाजविण्यात यशस्वी झाला आहे असं म्हणता येईल.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओजनं केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे हे आहेत. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट आहे. चित्रपटातील कलाकारांचा उत्तम अभिनय, उत्कृष्ट कथानक, सुरेल गाणी अन् दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटाचा अनेक दिवसांनी बोलबाला झाल्याचं दिसत आहे.

 

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा