You are currently viewing अणाव गावात पाच कृषी कन्या दाखल

अणाव गावात पाच कृषी कन्या दाखल

ओरोस

डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान संचलित छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस सिंधुदुर्गनगरी या महाविद्यालयातील बी एस सी चौथ्या वर्षात शिकत असलेल्या कृषिकन्या कुडाळ तालुक्यातील अणाव ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिक कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी दाखल झाल्या आहेत. यामध्ये तनया वळंजू, आशा परब, रसिका कोरगावकर, भाग्यलक्ष्मी नाईक, श्रीया गोदावरीकर या विद्यार्थिनींचा समावेश आहे.

ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२३-२४ या वर्षा करिता अणाव येथे या विद्यार्थिनी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत गावामध्ये राहून शेती विषयक माहिती जाणून घेणार आहेत. गावात राहून ग्रामीण शेती विषयक कार्यपद्धती, विविध संस्था, शाळा व प्रत्यक्ष शेतीवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करतानाच विविध प्रकारचे प्रात्यक्षिके करून दाखवणार आहेत. या कृषिकन्यांनी अणाव ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी सरपंच लीलाधर अणावकर, उपसरपंच अदिती अणावकर यांनी त्यांचे स्वागत केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =