You are currently viewing मातोंडच्या सातेरी जत्रोत्सव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची उपस्थिती

मातोंडच्या सातेरी जत्रोत्सव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची उपस्थिती

महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करण्याची बुध्दी आपल्याला देण्याचे घातले साकडे

वेंगुर्ले

विधानसभेचे अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांनी मातोंड गावची ग्रामदेवता व जागृत देवस्थान श्री देवी सातेरीच्या जत्रोत्सवाच्या निमित्ताने श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्यासहित सिंधुदुर्ग व या मातोंड गावचा विकास करण्याची बुद्धी मला देवो असे श्री देवी सातेरीकडे साकडे घालत मातोंड गावातील या जत्रेला येऊन “खाज” खात खात लोटांगण बघणे, जत्रेत आल्यावर उसळपाव खाणे तसेच इकडची खेळणी खरेदी करणे अशा जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजू नाईक, पश्चिम देवस्थान कमिटीचे माजी सदस्य हिरोजी उर्फ दादा परब, प्रमुख गावकर उदय परब, रमाकांत परब, तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम परब, पं स माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब, सोसायटी संचालक ज्ञानेश्वर केळजी, एम जी मातोंडकर, विद्याधर तावडे, डॉ भालचंद्र कांडरकर, रविकिरण परब, ताता मेस्त्री, रावजी परब, किशोर परब, सुधाकर परब, मातोंड तालाठी श्री गुरव यांच्यासाहित सर्व गावकर मंडळी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी समस्त गावकर मंडळी यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.
या वेळी बोलताना ऍड नार्वेकर म्हणाले की, श्री देवी सातेरीचा आशीर्वाद व कृपा सातत्याने आमच्या नार्वेकर कुटुंबावर आहे. गेले ३० ते ४० वर्ष आमचं संपूर्ण परिवार या जत्रेसाठी येतो. आणि आज विधानसभा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच श्री सातेरीच्या दर्शनासाठी येण्याची संधी मला प्राप्त झाली. निश्चितच मातोंड गावच्या विकासासाठी झुकत माप मिळेलच त्याच बरोबर पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास या विधानसभेच्या कार्यकाळात होईल असे त्यांनी आश्वासनही दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =