You are currently viewing बांदा येथील नागरिकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

बांदा येथील नागरिकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

बांदा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये बांदा येथील नागरिकांनी जाहिर प्रवेश केला. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी महापौर शरद मिसाल, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या उपस्थितीत बांद्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यामध्ये बांद्यातील संजय भाईप, राकेश परब, नेतर्डेतील गोविंद गवस, सुनिता गवस, संजय गवस, एकनाथ गवस, गोंविद ध. गवस, गोविंद वि.गवस, उत्तम गवस, सुभाष गवस, शिल्पा गवस, जानू झोरे, विलवडेतील विनायक सावंत, रितेश सावंत, सिद्धेश दळवी, नरेंद्र दळवी, प्रणीत दळवी, तेजस दळवी, सर्वेश दळवी, आरती दळवी, बांद्यातील तबस्सुम आगा, फातिमा आगा, इमामी शेख, महंमद आगा, आसिफ आगा, मोहसीन आगा, अझहर खतिब, शाहिद खतिब, सलिम खतिब, सुहेल जमादार, सिकंदर जमादार, आनिस मुल्ला, हनिफ मुजावर, प्रदिप कळंगुटकर, तौसिफ आगा, आयुब आगा, सोहेब बुराण, फैयाज खान, सोहेल शेख, साहिल विर, अदनान खतिब यांनी प्राथमिक प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी बांद्यातील पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच स्वागत केले. तर भविष्यात नक्कीच सावंतवाडी तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढेल असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, माजी महापौर शरद मिसाल यांनी, मी सावंतवाडीचा सुपुत्र आहे. त्यामुळे भुमिपुत्र या नात्यानं बांदा, सावंतवाडीची जनता संकंटात असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण ही आपली जबाबदारी आहे. तर आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत शरद मिसाल यांनी व्यक्त केले. दरम्यान, संकंटात राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जनतेचा मदतीसाठी धावून गेले. राष्ट्रवादीच्या माध्यमातून जनतेला मदतीचा हात दिला. या समस्यांकडे खा. शरद पवार यांच्यासोबत भेटी दरम्यान लक्ष वेधले, तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून मदत देखील पोहोचली.

आज बांद्यातील अनेक जण प्रवेश करत असून येत्या काळात राष्ट्रवादीला पुन्हा सुवर्ण दिवस येतील असा विश्वास माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी व्यक्त केला. २०१४ नंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा झेंडा बांद्यात फडकला, नुसताच फडकला नाही तर पक्ष प्रवेश होऊन पक्ष पुन्हा उभारी घेत आहे याचा आनंद आहे. बांद्यात महापुर आला असताना आम्ही येथील जनतेला आधार देण्याचा प्रयत्न केला. ज्या विश्वासान आपण पक्षप्रवेश करत आहात, नक्कीच आपला मानसन्मान पक्षात राखला जाईल अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, पिंपरी-चिंचवड माजी महापौर,विरोधी पक्षनेते शरद मिसाळ, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, राष्ट्रवादी नेते भास्कर परब, जिल्हाध्यक्ष व्हीजीएनटी अशोक पवार, महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व व्यापार दर्शना बाबर-देसाई, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, शैलेश लाड, अस्लम खतिब, सुर्यकांत नाईक, संतोष जोईल, राजू धारपवार, नाझिर शेख, बावतीस फर्नांडिस, इफ्तिकार राजगुरू, मनोज वाघमोरे, नंदकिशोर नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा