You are currently viewing बाळासाहेबांची शिवसेना आयोजित आणि समृद्धी फाउंडेशन पुरस्कृत नरकासुर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

बाळासाहेबांची शिवसेना आयोजित आणि समृद्धी फाउंडेशन पुरस्कृत नरकासुर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली

बाळासाहेबांची शिवसेना आयोजित आणि समृद्धी फाउंडेशन पुरस्कृत जिल्हास्तरीय नरकासुर स्पर्धेत शिवराई मित्रमंडळ हळवल आणि पटकीदेवी मित्रमंडळ कणकवली यांनी बनविलेल्या नरकासुर प्रतिकृतीला विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला. आचरा येथील हॉटेल उद्योजक तथा शिवसैनिक महेश राणे यांच्या हस्ते प्रथम विजेत्यांना रोख 11 हजार 101 रुपयांचे पारितोषिक विभागून देण्यात आले. तर द्वितीय क्रमांकाचे रोख रु 7 हजार 501 रुपयांचे पारितोषिक महापुरुष मित्रमंडळ बाजारपेठ आणि भालचंद्रनगर मित्रमंडळ कणकवली याना विभागून देण्यात आले. तृतीय क्रमांक विजेता ठरलेल्या आंबेआळी मित्रमंडळ कणकवली ला रोख रु. 5 हजार 501 रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. उत्तेजनार्थ सुदर्शन मित्रमंडळ कणकवली ला रोख रु 2 हजार 1 देऊन गौरविण्यात आले.

समृद्धी फाउंडेशन चे अध्यक्ष ऍड प्रवीण पारकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते सुनील पारकर, शिवसैनिक भास्कर राणे,बाळू पारकर, भूषण परुळेकर,शेखर राणे, दामू सावंत,निलेश तेली यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. जेष्ठ नाट्यकर्मी सुहास वरूणकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. रात्री उशिरापर्यंत छत्रपती शिवाजी चौक कणकवली येथे संपन्न झालेल्या या नरकासुर स्पर्धेला विविध मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आकर्षक आणि मनोवेधक नरकासुर पाहण्यासाठी आबालवृद्ध रसिकांनी लोट गर्दी केली होती. स्पर्धा यशस्वीतेसाठी माजी जि. प.सदस्य संजय आग्रे, संदेश पटेल, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, सुनील पारकर, शेखर राणे, मारुती सावंत, दामू सावंत, बाळू पारकर,बाबू आचरेकर,समर्थ सावंत, हळदणकर यांनी यशस्वी मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 6 =