You are currently viewing अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग आयोजित युध्दकला प्रशिक्षण शिबिर प्रशिक्षणाचा निरोप समारंभ उत्साहात

अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग आयोजित युध्दकला प्रशिक्षण शिबिर प्रशिक्षणाचा निरोप समारंभ उत्साहात

सावंतवाडी

येथील अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग,यांच्या संयोजाने कळसूलकर इंग्लिश स्कूलच्या मैदानात ७ दिवसाचे शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबिराचे प्रशिक्षणानंतर निरोप समारंभ राजवाडा येथे संपन्न झाला. यावेळी समारोपाच्या कार्यक्रमाला सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेमसावंत भोंसले, राणीसाहेब सौ.शुभदादेवी भोंसल, युवराज लखमराजे भोंसले, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई, युवा व्यावसायिक प्रतिक बांदेकर,अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष ओंकार तुळसुलकर,फिरंगोजी शिंदे आखाडा गिरगाव कोल्हापूर चे वस्ताद प्रमोद पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
७ दिवस सुरु असलेले हे प्रशिक्षण व आजचा निरोप समारंभ यशस्वी होण्यासाठी जितेंद्र मोरजकर,किशोर चिटणीस,राजू केळूसकर,डॉ.प्रसाद नार्वेकर,तुषार विचारे,अमित अरवारी,अण्णा म्हापसेकर,अभिषेक देसाई,मंदार केरकर,हेमंत मराठे,विनोद वालावलकर,बाळू वालावलकर वस्ताद प्रमोद पाटील यांचे सहकारी शिवराज पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा