You are currently viewing भाजपचा ठाकरे गटाला जोरदार धक्का

भाजपचा ठाकरे गटाला जोरदार धक्का

माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंदर, बुधवळे, हडी येथील अनेकांचा भाजपात प्रवेश

मालवण

मालवण तालुक्यात भाजपने ठाकरे गट शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंदर, बुधवळे, हडी येथील अनेकांनी भाजप पक्षात प्रवेश केला. यात शिवउद्योग आघाडी मालवण तालुकाप्रमुख मंगेश गांवकर यांच्या सह बुधवळे सरपंच-संतोष पानवलकर, तसेच चिंदर ग्रामपंचायत सदस्य निलेश रेवडेकर, स्वरा पालकर, जान्हवी घाडी, हडी ग्रामपंचायत सदस्य-ऋषीकेश आस्वलकर यासह बुधवळे येथील दिपक येरम, ऋषीकेश येरम, किरण जोईल, कृष्णा साटम, वैभव वाघ, अनिल येरम, आप्पा येरम, अमर सरमळकर, अविनाश सरमळकर, प्रकाश जाधव, अनंत सरमळकर, समिर टेंबुलकर, समिर घागरे, चिंदर येथील अरूण घाडी, भाई तावडे, प्रमोद परब, सागर परब, प्रमोद घाडी, केशव घाडी, नंदकुमार घाडी, अनिल घाडी, दिपक घाडी, दादू घाडी, गिरीश पवार, निखिल घाडी, हर्षाली गोलतकर, भारती गोलतकर, श्रेया पालकर, वासुदेव घाडी, गणेश पाटणकर, आशिर्वाद तावडे, रमेश घाडी, सचिन जाधव, संजय घाडी, नारायण घाडी, हेंमत घाडी, गणेश पाताडे, सौरभ परब, मंदार घाडी, शेखर पालकर, शिशिर पालकर, विद्याधर पालकर, शंकर पालकर, मनिष सावंत, अनंत आचरेकर, गणेश पालकर, नित्यानंद मेस्री, राजन पालकर, आत्माराम पालकर, रविंद्र पालकर, हडी येथीलअनंत सुभेदार, तेजम शेडगे, अजिंक्य तोंडवळकर आदींनी भाजप प्रवेश केला.

आचरा येथे हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, संतोष कोदे,खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, जेरॉन फर्नांडिस, जगदीश पांगे, संतोष गावकर, समीर बावकर, देवेंद्र हडकर, मुजफ्फर मुजावर, पळसंब सरपंच महेश वरक, अवधूत हळदणकर,, दीपक सुर्वे, विक्रांत नाईक, ललित चव्हाण, मनोज हडकर, बाबू कदम यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निलेश राणे म्हणाले, भाजप मध्ये प्रवेश केला त्यांचे स्वागत. प्रवेश करताना कोणतीही अट घातली नाही हा तुमचा मोठेपणा आहे. आपण ज्या पक्षात होता त्याठिकाणी आपली कामे झाली नाही. मात्र आता जे जे विकास काम सांगाल ते होईल. केंद्रात राणे साहेब आहेत. त्यांचे या जिल्ह्यावर पूर्ण लक्ष आहे. आपल्याला चव्हाण साहेब यांच्या सारखे पालकमंत्री भेटले. मतदारसंघात विकासकामे द्या ती पूर्ण केली जातील. या मतदारसंघात नऊ वर्षात ज्यांची सत्ता होती जे आमदार खासदार होते त्यांनी दुर्लक्ष केले. काही ठिकाणी तेच तेच रस्ते झाले यात काय फायदा होता हे जनता जाणते. ठेकेदासारीसाठी कामे झाली असावीत. अनेक गाव ओसाड पडले. रस्ते खड्डेमय बनले. मात्र मागील वर्षी आपली सत्ता आली. मालवण तालुक्यात या एकाच वर्षी ९० कोटी विकासनिधी आला आहे. हे आपले सरकार आहे. असे निलेश राणे म्हणाले.

माणसे योग्य असतील तर जिल्ह्या वेगळ्या उंचीवर जातो हे राणे साहेबांच्या पालकमंत्री काळात आणि आता चव्हाण साहेबांच्या काळात दिसून येत आहे. डीपीडीसी २५० कोटीच्या वर जाणार आहे. असेही निलेश राणे म्हणाले.

मालवण तालुक्याला आपले आमदार, खासदार नसताना ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा निधी दिला. यापुढेही विकासकामे होत राहतील. तुम्ही मागणी करा. परिपूर्ण प्रस्ताव द्या तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सर्व कामाना मंजुरी मिळवून देऊ. तुम्ही कामे करून घ्या. देणारे हात आपल्याकडे आहेत. येथे चव्हाण साहेब तर राणे साहेब केंद्रत आहेत. निधी कमी पडणार नाही.

गावागावात आमदाराची पत्रे दिली आहेत. त्याचे ढीग झाले मात्र विकासकामे नाहीत. या कारभाराला आता त्यांचीही लोक कंटाळली. कुडाळ मालवणात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश भाजपकडे सुरू आहेत.

याठिकाणी राणेंचा पराभव झाला मात्र आमदाराला मंत्री का केला नाही? उद्धव ठाकरेंचना ही कळलं याला अक्कल नाही. मतदारसंघातील जनतेची नऊ वर्षे फुकट घालवली. किनारपट्टी झुंजत ठेवली. प्रकल्प आणला नाही. विधान भवनात त्याला कोण ओळखत नाही. हरल कोण हे माहीत आहे, पण जिंकला कोण हे माहीत नाही. पण राणे साहेब थांबले नाहीत केंद्रात मंत्री झाले. असे कर्तृत्ववान नेतृत्व असलेल्या राणे साहेबांची आम्हाला शिकवण आहे प्रेमाने लोकांना जोडले पाहिजे.
यापुढे याठिकाणी भाजपचाच आमदार होणार.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − eight =