You are currently viewing तज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल अभिमन्यू लोंढे यांचा सत्कार…

तज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल अभिमन्यू लोंढे यांचा सत्कार…

सावंतवाडी

येथील खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांचा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि त्यांच्या मित्रमंडळींकडून सत्कार करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. साळगावकर यांनी केले. येथील गुरुकुलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, संजय पेडणेकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, राजा शिवाजी चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष बंटी माटेकर, डिजिटल मिडीया सेल अध्यक्ष अमोल टेंबकर, बंड्या तोरस्कर, संतोष तळवणेकर, जमीर शेख आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =