You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा चिरेखाण संघटना अध्यक्षपदी संतोष गावडे यांची निवड

सिंधुदुर्ग जिल्हा चिरेखाण संघटना अध्यक्षपदी संतोष गावडे यांची निवड

मालवण

सिधुदुर्ग जिल्हातील चिरेखाण व्यावसायिकांची अत्यत महत्वाची सभा कसाल येथील सिध्दीविनायक सभागृह येथे नुकतीच संपन्न झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा चिरेखाण संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी चौके येथील चिरेखाण व्यावसायिक संतोष गावडे यांची निवड करण्यात आली आहे.दरम्यान, उपाध्यक्षपदी मिंलिद साटम (देवगड), दत्ताराम राऊळ (दोडामार्ग), चद्रकांत हडकर (आचरा), महादेव पारकर, (कणकवली) तर सचिवपदी माळगांव येथील सुबोध पालव, सहसचिव महादेव मांडलकर व खजिनदार म्हणून दत्तात्रय गावडे यांची निवड करण्यात आली.
तर सदस्यपदी अमित साटम, भिकाजी जेढे, सचिन आंबेरकर, विकास हडकर, मदन सातोसकर, प्रविण बर्वे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी जिल्हातील चिरेखाण व्यावसायिक उपस्थितीत होते.

या सभेत हरित लवादाच्या आदेशा विरोध्द सुप्रिम कोर्टात दावा दाखल करून मिळालेल्या स्थगिती बाबत चर्चा करून पुढे कोर्टामध्ये भक्कमपणे आपली बाजू माडण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सुप्रिम कोर्टामध्ये स्थगिती मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करून स्थगिती मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर यांचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानण्यात आले.कोर्टातील संघटनेची पुढील वाटचाल प्रभुगांवकर याच्या मार्गदर्शना खाली करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी चिरेखाण व्यवसाय करत असताना येणार्‍या अन्य अडचणी बाबतही चर्चा करण्यात आली. त्याच प्रमाणे जिल्हातील सर्व व्यावसायिकांनी सघटीत होऊन एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. नवी चिरेखाण संघटना रजिस्टर करण्याचा निर्णय ही सर्वानुमते घेण्यात आला.या सभेत नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष गावडे यांसह मिलिंद साटम, लिग्रज, विकास हडकर, वैभव साळसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर दत्ताराम राऊळ यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 12 =