You are currently viewing दीपावली निमित्त आयोजित करण्यात किल्ले स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

दीपावली निमित्त आयोजित करण्यात किल्ले स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

बांदा

ज्येष्ठ नागरिक संघ बांदा तर्फे दीपावली निमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिपावली किल्ले स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. बांदा शहर मर्यादित घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण बावीस स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली.
दिनांक २८ व २९ ऑक्टोबरला स्पर्धेचे परीक्षण करून स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

प्रथम – शिवानंद संतोष परब, आंगडीवाडी, बांदा, द्वितीय- श्लोक बहिरे, निमजगा-बांदा, तृतीय- उत्कर्ष शेटकर, गवळीटेंब-बांदा, उत्तेजनार्थ- साईशा केसरकर, उभाबाजार-बांदा, नाविन्य म्हाडगुत, देऊळवाडा-बांदा.

या स्पर्धेचे परीक्षण अमित कुबडे आणि स्वप्नील गडकरी यांनी केले. लवकरच कार्यक्रमाचे आयोजन करून विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − nine =