You are currently viewing जेष्ठांच्या समस्या व उपाय
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

जेष्ठांच्या समस्या व उपाय

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखीत अप्रतिम लेख*

*जेष्ठांच्या समस्या व उपाय*

निसर्गाने आपणा सर्वांना ,प्राणीमात्रांना अनमोल जीवन प्रदान केले आहे.मानवाला तर बुध्दीचेही चेही वरदान दिले आहे.माणसाची वृत्ती कुटुंब वत्सल व एकमेकांवर अवलंबून रहाणारी.तसेच तो समाजप्रियही आहे.
सर्व लक्षात घेता साधारण पणे बालपण आईवडिलांच्या
छत्र छायेत मजेत व सुरक्षित जातं.मुलांप्रती असलेलं कर्तव्य शिक्षण ,त्यांना स्वबळावर उभं करणं,नोकरी व्यवसाय सुरू करून देणं,मुलींना ही शिकवून सुस्थळी विवाह करून देणं ..हे सारं पालक
जिव्हाळा ,आपुलकी व कर्तव्य म्हणून मनःपूर्वक
करतात.त्यावेळी त्यांना ही अनेक कौटुंबिक, आर्थिक ,
समस्या असतातच.पण त्यातून मार्ग काढत ते मुलामुलींना स्थीर करून देतात व कर्तव्य पूर्तीचे समाधान अनुभवतात.
समस्या सुरू होते ती त्यांच्या वयाच्या 60नंतरच.
काही ना आधीही.नोकरीतून निवृत्त झाले की थोडं स्वतःसाठी जगावं वाटतं,आराम करावा,दगदगीच्या ,धावपळीच्या जीवनातून असं वाटणं अत्यंत सहाजिक आहे.पण नेमकं याच वयात शरीर थकायला सुरवात होते.उच्च रक्तदाब,मधुमेह,
ह्रदयविकारसारखे आजार काही आनुवंशिकतेने बळावू लागतात.दवाखाना, चेक अप,औषधी जीवनाचा आवश्यक भाग होतो.जेष्ठ म्हणून आता समस्या सुरू
होतात.योग्य वेळी योग्य उपचार केले तर आजार आटोक्यात रहातात तेव्हा प्रकृती बद्दल स्रीपुरूष प्रत्येकाने जागरूक असणं
आवश्यक आहे.
आधुनिक उपचार पध्दतीमुळे माणसाचं आयुर्मान ही वाढलं आहे.
त्यामुळे जेष्ठ आणि वयोवृद्धांचे प्रमाण जास्त आहे.ते निरोगी असावेत नाही तर समस्या येतातच.
जेष्ठ मंडळींनी आजार होऊ नये यासाठी सकाळ संध्याकाळी फिरायला जाणे,प्राणायाम ,योग जरूर करावा.जेणे करून फुफुस्सांची शक्ती वाढते व सकारात्मक उर्जा मिळते.निसर्ग सानिध्याचा लाभ होतो.
आहारात बदल करावा,पोटाला मानवेल ,पचायला हलके अन्न सेवन करावे,आहारात सुके मेवे,फळांचा भरपूर वापर करावा,जीवनसत्त्व, क्षारांची कमतरता उरत नाही. वजन कमी करण्याचा प्रयत्न असावा.चिंता,ताणतणाव टाळावेत ,मुलांना त्यांचे निर्णय घेऊ द्यावेत.मार्गदर्शन जरूर करावे परंतु आग्रही असू नये.दवाखाना, औषधं
बँकव्यवहार जेष्ठ करू शकतात.प्रत्येक गोष्टीत घरी मुलं,सुना,नातवंड आहेत म्हणून विसंबून राहू नये.
या वयात कधी जोडीदाराचा चीरविरहही सहन करावा लागतो.आपल्या मुळे इतरांना सतत दुःखात ठेऊ नये.परिस्थितीचा समंजसपणे स्वीकार करावा.अशा वेळी,उतारवयात छंद महत्वाची भूमिका बजावतात.वाचन,लेखन,गायन,अध्यात्म,मुलांना शिकवणं,समाजसेवी संस्थात काही वेळ सहकार्य करणं यामुळे वेळ चांगला जाऊ शकतो.
आता विचार येतो तो वृध्दपणा येतो तेव्हा..
शरीर व्याधीमय होतं,डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही, हात थरथरतात,पाय डगमगतात,
आठवण रहात नाही, विसराळू किंवा स्मृतीभ्रंशही होतो.मधुमेहींना इंसुलिन घ्यावं लागतं,जखम व्हायला नको. मूत्रपिंडाचेआजार जडतात..हे सगळं काळजीने जीवन जगले तरी वयोमानानुसार येणारे विकार असतात.त्यात जेष्ठांना मुलांवर कुटुंबावर अवलंबून रहावे लागते.
कौटुंबिक संबंध प्रेम आपुलकी चे असतील ,संस्कार चांगले जपले असेल तर नंतरची पिढी त्यांची सेवा तत्परतेने करते.
आतापर्यंत आईवडिलांनी आपलं केलं तेव्हा त्यांचं करणं हे कर्तव्य मानले पाहिजे.जेष्ठांनी आपला पैसा पुढील अडचणी जाणून शिल्लक ठेवावा.मुलांवतही त्यांचे संसार सांभाळताना त्रास ,वाटणार नाही. वैद्यकीय सेवाही बरीच महागडी..तेव्हा उपचारासाठी पैसा हवाच.ती तरतूद आवश्यक.
वरचेवर आजारांच्या तपासण्या, औषधे व्यवस्थित द्यावी.कामातूनही जातीने त्याकडे लक्ष द्यावे.
आता दोघेही नोकरी करणारे ,लहान कुटुंब,मुलं बाहेर शिकायला,पन्नाशीच्या
स्रीपुरूषांनाही एव्हाना पाठदुखी,गुडघे..मान दुखी ताणतणाव आता असतात त्यामुळे त्यांना ही विवंचना असतातच.
जेष्ठांना ऐकू न आल्याने ते बोलतातही कमी..त्यांना वही किंवा पाटीवर महत्वाचं लिहून दाखवावं,महत्वाच्या
गोष्ट ष्टी सांगाव्या.येता जाता दखल घ्यावी त्यामुळे उपेक्षा वाटणार नाही. काठी किंवा व्हिलचेयर गरजेप्रमाणे अनिवार्य. चावत नसल्याने पचनाचा त्रास होतो तेव्हा अन्न मऊ शिजवून,सूपचे प्रमाण वाढवावे.चिकू,पपई,
सारखे फळं व फळांचा रस द्यावा.स्कीनचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून आंघोळीच्या पाण्यात निर्जंतुक द्रव्य घालावे.नरम कापड,टाँवेलने अंग कोरडे करून पावडर घालावे.पडून रहाल्याने बेड सोर्स होण्यिची भिती असते.त्वचेची काळजी घ्यावी.दिसत कमी असल्याने व पाय अडखळत असतील तर
घरातील पाय-यांची उंची कमी करावी.आवश्यक तिथे
बाथरूममधे सोयीस्कर होतील असे आधाराला राँड बसवून घ्यावे.पलंगावर जवळ बेल ठेवावी.म्हणजे उठून यायचा त्रास वाचेल.
घरचे नोकरीत बिझी असले तर पूर्ण वेळ त्यांचे करणारे
केयर टेकर ठेवावे.घरच्यांनीही ते बरोबर काळजी घेतात ना हे पहायला हवे.या सगळ्यांमधे
जेष्ठांप्रती प्रेम व आदरभाव अत्यंत महत्वाचा आहे.कुटुंबातील लोकांचे दोन मायेचे ,काळजीचे शब्द ही त्यांना खूप दिलासा देतात.तेव्हा आपणही कधीतरी या स्थितीत येणार ही जाणीव मनात सदैव असावी.ज्यांची मुले परदेशात आहेत,येऊ शकत नाही त्यांनी उत्तम ठिकाणी जेष्ठांची सोय करावी.आता सगळेच समजून घेतात.
आईवडीलच मुलांच्या प्रगतीसाठी आतुर असतात.
ते इकडे येऊ शकत नसले तरी छान व्यवस्था ठेऊ शकतात.अनेक माध्यमं आहेत,त्यांना प्रत्यक्ष बघता येतं,बोलता येतं तेवढं समंजसपणे स्विकारावं.
काळ कोणासाठीच थांबत नसतो.आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात जाणारच.ही सत्य परिस्थिती ची जाणीव ठेवली की सगळ्यांना जगणे सोपे आणि सहज होते……!
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*लेखन..अरूणा दुद्दलवार*
*दिग्रस.. यवतमाळ*

 

Advt

_*प्रवेश सुरू ..! प्रवेश सुरू …!! प्रवेश सुरू ..!!!*_🏃‍♀️🏃‍♂️

*_♻️ ADMISSION OPEN ♻️_*

_*🏥 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL*_

*_📕शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 💊औषध निर्माणशास्त्र पदविका व पदवी 🏥 D.PHARM & B.PHARM प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता 🏥 प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !_*

*_👉 आमच्या संस्थेची वैशिष्ट्ये_*

*_📕🔭अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय_*

*_🖥️अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा_*

*_👩🏻‍🏫अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग_*

*_👨🏻‍🎓माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू_*

*_रजिस्ट्रेशन फॉर्म 📋भरून देण्याची मोफत सुविधा तसेच F.C. सेवा उपलब्ध*

*_🌴🏥🌴निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्ग. लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत_*

_*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*_

*📲9763824245 /9420196031*

*_👉पत्ता : व्हि.पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव राज्यमार्गालगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_*

*Advt link*

———————————————-
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =